मंगलवार, दिसंबर 03 2024 | 02:17:53 AM
Breaking News
Home / Choose Language / marathi / “चित्रपटांचा आढावा: चित्रपट परीक्षणापासून चित्रपट वाचनापर्यंतचा प्रवास” या कार्यक्रमाद्वारे इफ्फी 2024 मध्ये माध्यम प्रतिनिधींचे चित्रपट रसग्रहण या विषयाचे प्रशिक्षण

“चित्रपटांचा आढावा: चित्रपट परीक्षणापासून चित्रपट वाचनापर्यंतचा प्रवास” या कार्यक्रमाद्वारे इफ्फी 2024 मध्ये माध्यम प्रतिनिधींचे चित्रपट रसग्रहण या विषयाचे प्रशिक्षण

Follow us on:

गोवा येथे आयोजित 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) अनुषंगाने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील पत्रसूचना कार्यालयाने  पुणे येथील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) सहकार्याने माध्यम प्रतिनिधींसाठी “चित्रपटांचा आढावा: चित्रपट परीक्षणापासून चित्रपट वाचनापर्यंतचा प्रवास” या संकल्पनेवर आधारित चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रमाचे आयोजन केले आहे.  चित्रपटीय कला आणि कौशल्य यांचे विविध पैलू जाणून घेण्यावर तसेच माहितीपूर्ण पद्धतीने चित्रपट वाचन करण्याचे महत्त्व शिकण्यावर लक्ष केंद्रित केलेल्या इफ्फीमधील नोंदणीकृत माध्यम प्रतिनिधींसाठीच केवळ या अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एफटीआयआयमधील डॉ.इंद्रनील भट्टाचार्य, प्रा.अमलान चक्रवर्ती आणि प्रा.मालिनी देसाई यांच्यासारख्या या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या नेतृत्वखाली हा अभ्यासक्रम पार पडला.

   

प्रा. डॉ.इंद्रनील भट्टाचार्य यांनी सहभागी प्रतिनिधींना ‘चित्रपट विश्लेषणाची तत्वे’ समजावून दिली. त्यानंतर  प्रा.अमलान चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखालील सत्रात ‘संकलन- एक कलात्मक साधन’ यावर चर्चा झाली. आणखी एका सत्रात प्रा.मालिनी देसाई यांनी ‘प्रकाशयोजना -एक नाट्यपूर्ण साधन’ याचे महत्त्व सांगितले.

“चित्रपट रसग्रहण म्हणजे केवळ प्रशंसा करणे नव्हे तर चित्रपट समजून घेणे आहे. प्रत्येक चित्रपट त्याच्या प्रेक्षकांवर काहीतरी परिणाम करण्याच्या उद्देशाने तयार केलेला असतो. काही चित्रपट तुमच्यासोबत रेंगाळत राहतात तर काहींबाबत तुम्हाला प्रश्न पडतात.” असे सांगून प्रा.अमलान चक्रवर्ती यांनी चित्रपटांच्या रसग्रहणाचे महत्त्व ठळकपणे मांडले. ऑस्कर 2025 पुरस्कारासाठी भारताची अधिकृत एंट्री असलेल्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचे उदाहरण देत त्यांनी चित्रपटांमध्ये दडलेल्या गहन समाजशास्त्रीय अर्थाचे निरुपण केले.

त्यानंतर प्रा.भट्टाचार्य यांनी लघुपटांच्या विश्लेषणावर आधारित विशेष सत्राचे संचालन केले. लघुपट प्रकारच्या चित्रपटांची रचना आणि कथाकथन तंत्र याविषयी त्यांनी सहभागींना अवगत केले.

राष्ट्रीय चित्रपट आर्थिक विकास महामंडळाचे (NFDC) व्यवस्थापकीय संचालक, श्री प्रितुल कुमार यांनी चित्रपटांच्या प्रचारात माध्यमांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करत प्रसारमाध्यमांनी, दिलेल्या त्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल आभार मानले. चित्रपट समजून घेण्याच्या महत्त्वाविषयी बोलताना त्यांनी नमूद केले की, “चित्रपट रसास्वाद अभ्यासक्रम चित्रपटांच्या दुनियेचे सखोल ज्ञान मिळविण्यासाठी खरोखर उपयुक्त ठरेल आणि माध्यमांना चित्रपट समजून घेण्यास आणि त्याविषयी लिहिण्यासाठी अधिक समृद्ध करेल.”

“हा अभ्यासक्रम गोवा आणि  भारतभरातील माध्यम प्रतिनिधींसाठी खुला होता कारण चित्रपटांना देशभरात आणि जगभरात नेण्यात माध्यमे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्यामुळे आमच्या माध्यम व्यावसायिकांच्या सोयीसाठी हा अभ्यासक्रम IFFI दरम्यान निश्चित करण्यात आला आहे,”असे   केंद्रीय संचार ब्युरोच्या पश्चिम विभागीय महासंचालक , श्रीमती स्मिता वत्स शर्मा यांनी सहभागींना संबोधित करताना सांगितले.तसेच हा अभ्यासक्रम आयोजित करण्यासाठी  FTII ने दिलेल्या अमूल्य पाठिंब्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले.

चित्रपटांचे प्रदर्शन केवळ साजरे  करून थांबू नये  तर त्यांच्या निर्मितीतील गुंतागुंतीच्या तपशिलांचाही अभ्यास केला पाहिजे,असे केंद्रीय संचार ब्युरो मुंबईचे सहसंचालक सय्यद रबीहश्मी यांनी आपल्या भाषणात सांगितले.

“विचारांची देवाणघेवाण करण्यात आणि जगाला सिनेमाची कला समजण्यात मदत करण्यात माध्यम महत्त्वाची भूमिका बजावते,असे अशा उपक्रमांचे महत्त्व विशद करताना प्रा. मालिनी देसाई म्हणाल्या. चित्रपट निर्माते म्हणून आम्ही आमचे दृष्टिकोन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत.  मीडिया आणि चित्रपट निर्माते यांच्यातील या परस्परसंवादाने – जे दोघेही एकमेकांशी ‘सुसंवाद साधत’ आहेत– त्यामुळे एकमेकांच्या दृष्टीकोनाबद्दलची आमची समज मोठ्या प्रमाणात समृद्ध होते, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमाची प्रशंसा करताना   पत्रकार आणि 1999 पासून IFFI वृत्तांकन करत असलेल्या स्क्रीन ग्राफियामधील सहभागी श्रीमती हर्षिता म्हणाल्या, “चित्रपट पत्रकारांना शिक्षित करण्याचा  मंत्रालयाचा हा एक उत्तम उपक्रम आहे.  त्यामुळे सर्वांचे चित्रपटांविषयीचे ज्ञान वाढेल. मला आशा आहे की या अभ्यासक्रमाची भविष्यात पुनरावृत्ती होत राहील.”

“मी 1983 पासून इफ्फीमध्ये सहभागी होत आहे. हे सत्र अतिशय माहितीपूर्ण आणि शैक्षणिक होते. 55 व्या IFFI मध्ये खूप मोलाची भर घालत पत्रकारांना चित्रपटांचे अधिक खोलवर माहिती मिळण्यास यामुळे मदत होईल”,असे मत गेल्या चार दशकांपासून इफ्फीमध्ये सहभागी होत असलेले ज्येष्ठ पत्रकार श्री सत्येंद्र मोहन यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाची सांगता समारोपसत्राने झाली.सत्राला उपस्थित राहिलेल्या 30 हून अधिक माध्यम प्रतिनिधींना यावेळी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. चित्रपटाचा आस्वाद घेण्याची प्रक्रिया त्यांची समज वाढली असल्याचे माध्यम प्रतिनिधींनी आवर्जून सांगितले.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

प्लास्टिक प्रदूषण रोखणे आणि प्रामुख्याने विकसनशील देशांच्या शाश्वत विकासाला बाधा न पोहचवता यात महत्त्वपूर्ण समन्वय साधण्याचे भारताचे बुसानमधील आयएनसी-5 समारोप सत्रामध्ये आवाहन

दक्षिण कोरियातील बुसान येथे आयोजित आंतरशासकीय वाटाघाटी समितीच्या (आयएनसी-5) पाचव्या अधिवेशनाच्या समारोप सत्रामध्ये भारताने आपली भूमिका मांडताना प्लास्टिक …