मंगलवार, दिसंबर 03 2024 | 02:15:54 AM
Breaking News
Home / Choose Language / marathi / आसियान-भारत वस्तू व्यापार कराराबाबतच्या संयुक्त समितीची सहावी बैठक नवी दिल्ली येथे संपन्न

आसियान-भारत वस्तू व्यापार कराराबाबतच्या संयुक्त समितीची सहावी बैठक नवी दिल्ली येथे संपन्न

Follow us on:

नवी दिल्ली येथील वाणिज्य भवनात आसियान-भारत वस्तू व्यापार कराराबाबतच्या संयुक्त समितीची (एआयटीआयजीए) सहावी बैठक तसेच इतर संबंधित बैठका नुकत्याच पार पडल्या. दिनांक 15 ते 22 नोव्हेंबर 2024 या कालावधीत संपन्न झालेल्या या बैठकांमध्ये एआयटीआयजीएचा आढावा घेण्यासाठी चर्चा झाली. केंद्रीय वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल व मलेशियाच्या गुंतवणूक मंत्रालयातील व्यापार विभागाचे उप सरचिटणीस मस्तुरा अहमद मुस्तफा यांच्या सहा-अध्यक्षपदाखाली एआयटीआयजीए संयुक्त समितीचे सदस्य 21 आणि 22 नोव्हेंबर 2024 या कालावधीत एकत्र आले. यावेळी ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओ पीडीआर, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड व व्हिएतनाम असा सर्व 10 आसियान देशांचे प्रमुख आणि प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

बाजारपेठेतील पोहोच, उत्पत्तिस्थान विषयक नियम, एसपीएस उपाययोजना, मापदंड आणि तांत्रिक नियमने, सीमाशुल्क विभागाच्या प्रक्रिया, आर्थिक आणि तंत्रज्ञानसंबंधी सहकार्य, व्यापार संबंधी समस्यांवर तोडगे, आणि कायदेशीर तसेच संस्थात्मक तरतुदी इत्यादी विषयांशी संबंधित पैलूंबाबत वाटाघाटी करण्यासाठी एआयटीआयजीए संयुक्त समिती अंतर्गत 8 उप-समित्या कार्यरत आहेत. वाटाघाटींच्या या फेरीदरम्यान या सर्व 8 उप-समित्यांचे सदस्य एकत्र आले. यापैकी, 5 उप-समित्या एआयटीआयजीए संयुक्त समितीच्या 6 व्या बैठकीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष भेटून बैठक घेऊ शकल्या.

एआयटीआयजीएच्या या आढावा वाटाघाटींच्या फेरीच्या आधी लाओसमध्ये व्हिएनटीने येथे सप्टेंबर 2024 मध्ये 21 वी आसियान-भारत अर्थमंत्र्यांची बैठक पार पडली तर ऑक्टोबर 2024 मध्ये 21 वी आसियान -भारत शिखर परिषद संपन्न झाली.या दोन्ही बैठकींच्या कार्यवाहीदरम्यान अर्थमंत्र्यांनी तसेच पंतप्रधान/प्रमुख नेत्यांनी एआयटीआयजीए संयुक्त समितीला जलदगतीने वाटाघाटी करून वर्ष 2025 पर्यंत आढाव्याच्या निष्कर्षाप्रत येण्याच्या दिशेने काम करण्याचे आवाहन केले. नुकत्याच पार पडलेल्या वाटाघाटींच्या फेरीत उप-समित्यांनी मजकुराबाबतच्या चर्चेत उत्तम प्रगती केली आहे तसेच दरविषयक वाटाघाटी सुरु करण्याच्या दिशेने काही ठोस कार्यवाही देखील झाली आहे.

आसियान प्रतिनिधींनी नवी दिल्लीला दिलेली भेट आणि त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती यांचा लाभ घेत थायलंड आणि इंडोनेशिया या देशांच्या शिष्टमंडळाने  द्विपक्षीय व्यापारविषयक मुद्द्यांवरील चर्चेच्या अनुषंगाने द्विपक्षीय बैठका घेतल्या. भारतीय आणि असियानच्या मुख्य वाटाघाटीकारांनी देखील चर्चेच्या अंतर्गत उपस्थित मुद्द्यांबाबत परस्पर सामंजस्य विकसित करण्यासाठी तसेच पुढील वाटचाल निश्चित करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेतली.

आसियान हा भारताच्या प्रमुख व्यवसाय भागीदारांपैकी एक गट असून भारताच्या जागतिक व्यापारात या गटाचा 11% वाटा आहे. वर्ष 2023-24 मध्ये 121 अब्ज डॉलर्स मूल्याचा द्विपक्षीय व्यापार एप्रिल ते ऑक्टोबर 2024 मध्ये 5.2% च्या वृद्धीसह 73 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. एआयटीआयजीए चा आढावा हे आसियान प्रदेशात शाश्वत पद्धतीने व्यापार वाढवण्याच्या दिशेने पुढे टाकलेले पाऊल असेल. एआयटीआयजीएच्या संयुक्त समितीची यापुढील बैठक फेब्रुवारी 2025 मध्ये इंडोनेशियामध्ये जकार्ता येथे होणार आहे.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

प्लास्टिक प्रदूषण रोखणे आणि प्रामुख्याने विकसनशील देशांच्या शाश्वत विकासाला बाधा न पोहचवता यात महत्त्वपूर्ण समन्वय साधण्याचे भारताचे बुसानमधील आयएनसी-5 समारोप सत्रामध्ये आवाहन

दक्षिण कोरियातील बुसान येथे आयोजित आंतरशासकीय वाटाघाटी समितीच्या (आयएनसी-5) पाचव्या अधिवेशनाच्या समारोप सत्रामध्ये भारताने आपली भूमिका मांडताना प्लास्टिक …