आयुष मंत्रालयाची आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (सीसीआरएएस), त्यांच्या केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था (सीएआरआय), बेंगळुरू च्या माध्यमातून 1–2 डिसेंबर 2025 रोजी ए.व्ही. रामा राव सभागृह, भारतीय विज्ञान संस्था (IISc), बंगळुरू येथे आयुर्वेद आणि लठ्ठपणा आणि चयापचय आजारासाठी एकात्मिक दृष्टिकोन या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करत आहे. आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सीसीआरएएस या स्वायत्त संस्थेच्या 57 व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने ही परिषद आयोजित केली जात आहे.
भारतीय विज्ञान संस्था आणि निमहान्स यांच्या सहकार्याने आयोजित, या परिषदेचा उद्देश पुराव्यावर आधारित आयुर्वेदिक आणि एकात्मिक वैद्यकीय पद्धतींच्या माध्यमातून लठ्ठपणा आणि चयापचय आजाराचा वाढता जागतिक भार कमी करण्याचा प्रयत्न करणे हा आहे. हा वैज्ञानिक कार्यक्रम संशोधन-आधारित एकात्मिक आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी आणि जागतिक आरोग्य परिणामांना गती देण्याप्रति आयुष मंत्रालयाचा दृष्टिकोन प्रतिबिंबित करतो.

या परिषदेत भारत आणि परदेशातील आयुर्वेद, आधुनिक औषध विज्ञान , जीवन विज्ञान आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील आघाडीचे तज्ञ एकत्र येतात. शैक्षणिक कार्यक्रमात पूर्ण सत्रे, समांतर वैज्ञानिक सत्रे आणि ट्रांसलेशनल सायन्स आणि टाइप-२ मधुमेह, स्थूलता आणि डिस्लिपिडेमियाचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर एक परिसंवाद होणार आहे. 2 डिसेंबर रोजी टीसीएस स्मार्ट-एक्स हब, आयआयएससी येथे नॅनोटेक्नॉलॉजी आणि आण्विक जीवशास्त्र या विषयावरील एक विशेष कार्यशाळा आयोजित केली जाईल. समत्वम, पथशोध आणि सीएआरआयद्वारे एक आरोग्य तपासणी शिबिर दोन दिवस चालेल. 25–27 नोव्हेंबर 2025 दरम्यान परिषद-पूर्व आभासी वैज्ञानिक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. सीसीआरएएसच्या जेडीआरएएस या संशोधन जर्नलचा लठ्ठपणा आणि चयापचय विकारांवरील विशेष अंक आणि इतर 10 पुस्तके देखील या कार्यक्रमादरम्यान प्रकाशित केली जातील.
यात 700 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये प्रख्यात शास्त्रज्ञ, चिकित्सक आणि संशोधकांची 267 मौखिक सादरीकरणे, 120 व्हर्च्युअल पेपर सादरीकरणे, 70 पोस्टर्स आणि 16 प्रमुख आणि पूर्ण व्याख्याने होतील.
आयुर्वेद आणि लठ्ठपणा आणि चयापचय आजारांसाठी एकात्मिक दृष्टिकोनावरील आंतरराष्ट्रीय परिषद एकात्मिक संशोधनाला गती देण्यासाठी, जागतिक सहकार्यांना बळकटी देण्यासाठी आणि समग्र आणि सुलभ आरोग्यसेवेप्रति भारताच्या दृष्टिकोनाला अनुरूप पुराव्यावर आधारित नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्याप्रति सीसीआरएएसची वचनबद्धता अधोरेखित करते.
Matribhumi Samachar Gujarati

