नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे आज 15 डिसेंबर 2025 रोजी इराण, बृनेई दारुस्सलाम, मायक्रोनेशिया या तीन देशांच्या राजदूतांकडून त्यांची ओळखपत्रे स्वीकारली. पुढील व्यक्तींनी आपले ओळखपत्र यावेळी सादर केले- 1. मोहम्मद फथली , इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे राजदूत 2. सिती आर्नीफारिजा मोहम्मद जैनी,बृनेई …
Read More »जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
आज मी हाशेमाइट किंगडम ऑफ जॉर्डन, फेडरल डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ इथिओपिया आणि सल्तनत ऑफ ओमान या तीन राष्ट्रांच्या दौर्यावर जात आहे. या तिन्ही देशांशी भारताचे प्राचीन काळापासूनचे सभ्यताकालीन आणि व्यापक समकालीन द्विपक्षीय संबंध आहेत. सर्वप्रथम, मी महामहिम अब्दुल्ला दुसरे इब्न अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून जॉर्डनला भेट देणार आहे. ही ऐतिहासिक भेट …
Read More »भारत पारंपरिक औषधांवरील दुसऱ्या डब्ल्यूएचओ जागतिक शिखर परिषदेचे करणार आयोजन
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2025. भारत संयुक्तपणे दुसऱ्या जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) पारंपरिक औषध शिखर परिषदेचे 17 ते 19 डिसेंबर 2025 दरम्यान आयोजन करत असून नवी दिल्ली आरोग्य आणि कल्याणावरील जागतिक संवादाचे केंद्रबिंदू बनेल. जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाद्वारे सह-आयोजित ही शिखर परिषद संतुलित, सर्वसमावेशक आणि शाश्वत आरोग्य …
Read More »दूरदृष्टी आणि अथक अंमलबजावणीने भारताच्या ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन घडवले: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2025. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, यांनी आज नवी दिल्ली येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, गेल्या 11 वर्षांतील भारताच्या ऊर्जा क्षेत्राचा प्रवास या गोष्टीचा पुरावा आहे की, दूरदृष्टी, प्रामाणिक हेतू आणि अथक अंमलबजावणी एका राष्ट्राचे भविष्य बदलू शकते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त, …
Read More »राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण गोव्यात पूर्णपणे कार्यरत; वारसा संरक्षण आणि विकासासाठी स्पष्ट चौकट निश्चित: केंद्रीय संस्कृती मंत्र्यांचे स्पष्टीकरण
पणजी, 15 डिसेंबर 2025. राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण गोव्यात गठित झाले असून, ते पूर्णपणे कार्यरत आहे अशी माहिती केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी लोकसभेत दिली. यामुळे राज्यातील संरक्षित स्मारके आणि वारसा स्थळांभोवती बांधकाम, दुरुस्ती आणि विकासात्मक कार्यांचे पद्धतशीर नियमन सुनिश्चित केले जात आहे,असे त्यांनी सांगितले. दक्षिण गोव्याचे खासदार …
Read More »पंतप्रधानांकडून ऑस्ट्रेलियातील दहशतवादी हल्ल्याचा निषेध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या बोंडी किनाऱ्यावर, ज्यू धर्मियांच्या हनुका या सणाचा पहिला दिवस साजरा करणाऱ्या लोकांना लक्ष्य करणाऱ्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या दुःखद घटनेबद्धल तीव्र शोक व्यक्त करताना,या घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांविषयी मोदी यांनी भारताच्या नागरिकांच्या वतीने संवेदना व्यक्त केल्या आहेत. या दुःखद प्रसंगी, सर्व …
Read More »अथणीमध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या 25 फूट उंच पुतळ्याचे उद्घाटन
केंद्रीय दूरसंचार आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते आज रविवारी कर्नाटकमधील बेळगावी इथल्या अथणी इथं मराठा शिरोमणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 25 फूट उंच भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्या प्रसंगी बोलताना सिंधिया म्हणाले की, हा प्रसंग ऐतिहासिक असून, हे केवळ एका पुतळ्याचे अनावरण नसून, भारताचा स्वाभिमान, शौर्य आणि हिंदवी स्वराज्याची भावना …
Read More »भारतीय नौदल आयएनएएस 335 (ऑस्प्रेझ) या स्क्वाड्रनला ताफ्यात समाविष्ट करणार
भारतीय नौदल 17 डिसेंबर 2025 रोजी गोवा येथील आयएनएस हंसा या नौदलाच्या हवाई तळावर आपली दुसरी एमएच 60 आर हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन, आयएनएएस 335 (ऑस्प्रेझ) ताफ्यात समाविष्ट करणार आहे. या कार्यक्रमाला नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी उपस्थित राहणार आहेत. हा प्रसंग भारतीय नौदलाच्या आधुनिकीकरण आणि क्षमतावृद्धीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतील एक महत्त्वाचा टप्पा …
Read More »देशांतर्गत उत्पादनात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी सरकार, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकरिता (MSMEs) सूट व शिथिलता देऊन गुणवत्ता नियंत्रण आदेश (QCOs) करते लागू
भारत सरकार, ग्राहक व्यवहार मंत्रालय, अन्न व सार्वजनिक वितरण विभागांतर्गत भारतीय मानक ब्युरो (BIS) मार्फत, संबंधित मंत्रालयांनी जारी केलेले गुणवत्ता नियंत्रण आदेश (QCOs) टप्प्याटप्प्याने लागू करते, ज्यामध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) सूट तसेच शिथिलता दिली जाते, जेणेकरून गुणवत्ता नियंत्रण आदेशांमुळे देशांतर्गत उत्पादनात कोणताही व्यत्यय येणार नाही. काही प्रमुख सवलती व सूट खालीलप्रमाणे आहेत: सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी …
Read More »फिट इंडिया संडेज ऑन सायकलच्या 53 व्या आवृत्तीची गोव्यात सुरुवात; सशस्त्र दल, अभिनेते, खेळाडू आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने डिसेंबर 2024 मध्ये सुरू केलेल्या देशव्यापी फिटनेस चळवळीच्या 53 व्या आवृत्तीचे आयोजन आज, 14 डिसेंबर रोजी गोव्यातील पणजी येथील मिरामार येथे करण्यात आले. ही मोहीम सायकलिंगला शाश्वत, सर्वसमावेशक आणि पर्यावरणपूरक व्यायामाचा प्रकार म्हणून प्रोत्साहन देते. मिरामार येथील या कार्यक्रमात सशस्त्र दलांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला. सैन्यातील …
Read More »
Matribhumi Samachar Marathi