Wednesday, September 02 2026 | 07:48:28 AM
Breaking News

Education

नागपूर: डब्लूसीएलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा दीक्षांत समारंभ संपन्न; ‘शस्त्र’ सिम्युलेटर ठरले विशेष आकर्षण

नागपूर येथील इंदोरा परिसरात असलेल्या वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (WCL) च्या सुरक्षा प्रशिक्षण केंद्रात ३१ ऑगस्ट २०२६ रोजी दीक्षांत समारंभ आणि दीक्षांत संचलन (Convocation and Passing Out Parade) मोठ्या उत्साहात पार पडले. कोल इंडिया लिमिटेडच्या (CIL) विविध उपकंपनींमधील अधिकारी आणि विभागीय सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आपले खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. या सोहळ्याला …

Read More »

पंतप्रधान मोदींकडून ताश्कंदमध्ये लाल बहादूर शास्त्रींना आदरांजली; उझबेक विद्यार्थ्यांसाठी ‘शास्त्री शिष्यवृत्ती’ जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उझबेकिस्तानच्या अधिकृत राजकीय दौऱ्यादरम्यान ताश्कंद येथील ‘शास्त्री स्मारकाला’ भेट देऊन भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना पुष्पांजली अर्पण केली. सन १९६५ च्या ताश्कंद करारानंतर घडलेल्या दुर्दैवी घटनेस आणि शास्त्रीजींच्या निधनाला यावर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर ताश्कंदमधील शास्त्रीजींच्या वारशाची उजळणी आणि भारत-उझबेकिस्तान संबंधांचा …

Read More »

शैक्षणिक संस्थांनी संशोधन अन् नवोन्मेषाची जागतिक केंद्रे बनावे: उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन

“देशातील शैक्षणिक संस्थांनी केवळ मूलभूत शिक्षण आणि पदव्या देण्यापुरते मर्यादित न राहता ज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषाची जागतिक केंद्रे म्हणून स्वतःला विकसित केले पाहिजे,” असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. पेरुंदुरई, इरोड येथील ‘कोंगू वेल्लाळर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (KVITT) ट्रस्टच्या संस्थापक दिन सोहळ्यात आणि ‘अरीवुकुडम’ या अत्याधुनिक ज्ञानकेंद्राच्या उद्घाटन …

Read More »

‘शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा’ या डॉ. आंबेडकरांच्या मंत्राचा राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केला खरा अर्थ; लखनौमधील दीक्षांत समारंभात आवाहन

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशातील लखनौ येथील बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाच्या (BBAU) दीक्षांत समारंभात उपस्थितांना संबोधित करताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. आंबेडकरी मंत्राचा आधुनिक संदर्भ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा” या प्रसिद्ध मंत्राचे विश्लेषण करताना राजनाथ सिंह म्हणाले …

Read More »

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे चेन्नईतील डॉ. एम.जी.आर. शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या 34व्या पदवीदान समारंभात मार्गदर्शन

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी आज चेन्नई येथील डॉ. एम.जी.आर. शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या 34व्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले. पदवी मिळणे म्हणजे आयुष्यातील नवीन टप्प्याची सुरुवात असून या टप्प्यात अधिक जबाबदाऱ्यांबरोबर संधीही उपलब्ध होतात असे त्यांनी सांगितले. हे …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्‍ये एनआयटी जमशेदपूरचा दीक्षांत समारंभ

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2025. राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्‍ये  आज (29 डिसेंबर, 2025) झारखंडमधील जमशेदपूर येथे एनआयटी जमशेदपूरचा दीक्षांत समारंभ संपन्‍न झाला. या प्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, सध्याच्या युगातील तांत्रिक बदलांचा वेग अभूतपूर्व आहे. हे बदल नवीन संधी निर्माण करत असले तरी, ते नवीन आव्हानेही निर्माण करीत आहेत. तांत्रिक …

Read More »

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी पुद्दुचेरी विद्यापीठाच्या 30 व्या दीक्षांत समारंभाला केले संबोधित

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2025. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज पुद्दुचेरी विद्यापीठाच्या 30 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित केले. पदवीधर विद्यार्थ्यांनी राष्ट्रनिर्माणाची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन त्यांनी केले. हे पदवीधर ‘विकसित भारत @2047’ चे शिल्पकार आहेत  असे वर्णन त्यांनी केले. दीक्षांत समारंभ हा केवळ शैक्षणिक यशाचा उत्सव नाही, तर अधिक मोठ्या …

Read More »

केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षेच्या निकालाबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल कोचिंग संस्थेला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ठोठावला 11 लाख रुपयांचा दंड

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2025. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने व्हिजन आयएएस (अजय व्हिजन एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड) या संस्थेला 11 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नागरी सेवा परीक्षा 2022 आणि 2023 च्या निकालांबाबत आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करून ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे उल्लंघन केल्याप्रकरणी प्राधिकरणाने ही कारवाई केली …

Read More »

‘सर्वात लहान दिवस, सर्वात मोठा संदेश’: आयआयएम नागपूरमध्ये जागतिक ध्यान दिन साजरा

नागपूर : २१ डिसेंबर २०२५. भारतीय प्रबंध संस्था नागपूर (आयआयएम नागपूर) परिसरात रविवारी सकाळी जागतिक ध्यान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शारीरिक आरोग्यापलीकडे जाऊन आत्मकल्याणावर भर देण्याची गरज असल्याचे वक्त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमात बोलताना हिमालयन समर्पण ध्यानयोग चळवळीचे संस्थापक शिवकृपानंद स्वामीजी यांनी ध्यानाच्या मूळ उद्देशावर प्रकाश टाकला. योगामुळे शरीर सुदृढ होते …

Read More »

पुण्याच्या ‘एआयटी’ला अभियांत्रिकी शिक्षण उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय आयईआय (IEI) पुरस्कार प्रदान

‘इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया)’ तर्फे पुण्याच्या ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ला (‘एआयटी) ‘अभियांत्रिकी शिक्षण उत्कृष्टता पुरस्कार 2025’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षणामध्ये संस्थेने दिलेल्या सातत्यपूर्ण योगदानाची ही एक महत्त्वाची राष्ट्रीय पावती आहे. अभियंत्यांसाठीच्या भारताच्या सर्वोच्च व्यावसायिक संस्थेने सुरू केलेला हा पुरस्कार, सातत्यपूर्ण शैक्षणिक उत्कृष्टता, नावीन्य आणि राष्ट्रीय प्राधान्यक्रमांशी …

Read More »