केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत आपत्ती व्यवस्थापन (सुधारणा) विधेयक, 2024 मंजूर झाल्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे आभार मानले.
एक्स प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली, भारत आपत्तींच्या वेळी शून्य जीवितहानी साध्य करण्याच्या मार्गावर वाटचाल करत आहे. या दिशेने, लोकसभेने आज आपत्ती व्यवस्थापन (सुधारणा) विधेयक, 2024 मंजूर केले. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मी मोदीजींचे मनापासून आभार मानतो. या कायद्यातील आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या तरतुदी आपल्या नागरिकांना कोणत्याही आपत्तीपासून वाचवण्यासाठी आपल्या प्रतिसाद दलांना सक्षम करून आपत्ती-प्रतिरोधक भारत निर्माण करण्याच्या मोदीजींच्या संकल्पनेला बळ देतील. हे विधेयक आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रतिक्रियात्मक दृष्टिकोनाऐवजी सक्रीय दृष्टिकोनाला प्राधान्य देऊन प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेचा मार्ग प्रशस्त करते.”
Matribhumi Samachar Marathi

