Monday, December 08 2025 | 03:35:44 PM
Breaking News

भारतीय मानक ब्युरोने सिंधुदुर्ग येथे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसाठी जागरूकता कार्यक्रमाचे केले आयोजन

Connect us on:

भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखा कार्यालयाने 12 डिसेंबर 2024 रोजी सिंधुदुर्ग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसाठी सर्वसमावेशक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील (आयएएस) होते. पाटील यांनी  शासन आणि लोककल्याणातील भारतीय मानकांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करून वस्तू खरेदी करताना आयएसआय चिन्ह असलेल्या  उत्पादनांचा वापर  करण्याच्या महत्त्वावर भर दिला.

भारतीय मानक ब्युरोचे  सहसंचालक महेंद्रसिंह जाखड आणि उपसंचालक अमन सिंह  यांनी तपशीलवार सादरीकरण करत गुणवत्ता, सुरक्षितता आणि टिकाऊपणा वाढवण्यात भारतीय मानकांच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल उपस्थितांना  माहिती दिली.  परस्परसंवादी चर्चांना चांगला प्रतिसाद मिळाला आणि सहभागींनी उत्कृष्टतेच्या संस्कृतीला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून या उपक्रमाचे कौतुक केले. सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी), कृषी, पाटबंधारे, अग्निशमन सेवा, महिला आणि बाल विकास,  महानगरपालिका आणि विद्युत विभाग यांसह  प्रमुख विभागातील 60 हून अधिक अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाने शासनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये गुणवत्ता आणि मानकांप्रती बांधिलकीची  भावना वृद्धिंगत केली.

वचनबद्धतेचे  प्रतिक म्हणून, उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी गुणवत्तेची शपथ घेतली, समाजाच्या कल्याणासाठी भारतीय मानके आपापल्या क्षेत्रात समाकलित करण्याचा संकल्प केला. हा ऐतिहासिक उपक्रम शासनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये गुणवत्तेबाबत सजगतेला  प्रोत्साहन देण्याप्रति, प्रगती, सुरक्षितता आणि विश्वासार्हतेसाठी नवीन मापदंड स्थापित करण्याप्रती  भारतीय मानक ब्युरोची अतूट बांधिलकी अधोरेखित करतो.  मानके आणि उत्कृष्टतेने परिभाषित केलेले भविष्य घडवण्यासाठी बीआयएस पथदर्शक म्हणून काम करत आहे.

या कार्यक्रमाला सिंधुदुर्गचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर कवडे, सिंधुदुर्गचे उपजिल्हाधिकारी  मच्छिंद्र सुकटे; आणि  सिंधुदुर्गच्या जिल्हा पुरवठा अधिकारी आरती देसाई यांच्यासह अनेक मान्यवर अधिकारी उपस्थित होते.

About Matribhumi Samachar

Check Also

नागपुरात जागतिक मृदा दिनी सेंद्रीय शेती संदर्भात प्रादेशिक सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती केंद्र तसेच एनडीआरएफ अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

नागपूर 5 डिसेंबर 2025 मृदेचे आरोग्य आपण जर व्यवस्थित राखले , रसायनाचा उपयोग न करता  कचऱ्यापासून …