Tuesday, December 30 2025 | 11:12:13 AM
Breaking News

ग्वाल्हेरमध्ये जी एस आय भूविज्ञान संग्रहालयाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन

Connect us on:

मध्य प्रदेशात ग्वाल्हेर मध्ये व्हिक्टोरिया मार्केट इमारत येथे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज फित कापून आणि फलकाचे अनावरण करून अत्याधुनिक भूवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडिया (जीएसआय ) भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन केले. भव्य परंपरेसह  आधुनिक नवकल्पनांच्या चमत्कारांचा अनोखा संयोग घडवत एका उल्लेखनीय सोहळ्याच्या स्वरुपात हा कार्यक्रम सादर झाला.

ग्वाल्हेर भूविज्ञान संग्रहालय  हे पृथ्वीच्या गाथेतील  चमत्कारांचे प्रवेशद्वार म्हणून काम करेल – विज्ञान आणि कलारुपी जिज्ञासा वाढीस लागतील असे ज्ञानाचे पवित्र स्थान आहे.  यात दोन विशेष गॅलरी आहेत, जी आपल्या ग्रहाची रहस्ये आणि काळाचा पट उलगडत जीवन प्रवासाची झलक देतात.

गॅलरी I, प्लॅनेट अर्थ: इट्स युनिकनेस इन डायव्हर्सिटी या शीर्षकाची ही गॅलरी सात विभागांमध्ये पृथ्वीचे चमत्कार दाखवते ज्यात ज्वालामुखी, उल्का आणि चुंबकीय क्षेत्र अधोरेखित केले आहे .  अत्याधुनिक मल्टीमीडिया प्रदर्शन, परस्परसंवादी प्रारूपे, डिजिटल कथाफलक आणि दुर्मिळ भूवैज्ञानिक नमुने यासह ही गॅलरी एका चमकदार व्यासपीठाच्या रुपात अवतरते जिथे विज्ञान जिवंत होते.  यात अंटार्क्टिक खडक, दुर्मिळ रत्न, जपानमधील ज्वालामुखीय खडक, हिमालयीन जीवाश्म, डेक्कन ट्रॅप झिओलाइट्स, मितीय दगड आणि डायनासोरची अंडी यांचा समावेश असलेला असाधारण खजिना आहे, ज्यामुळे बौद्धिक आणि काल्पनिक अशा दोन्ही क्षेत्रांसाठी एक संपन्न मेजवानी ठरते .

गॅलरी II, पृथ्वीवरील जीवनाची उत्क्रांती या शीर्षकाची ही गॅलरी, जीवनाच्या महाकाव्याचा इतिहास उलगडते, ज्याचा उगम होमो सेपियन्सच्या उदयापर्यंत घेऊन जातो. अत्यंत बारकाईने उभ्या केलेल्या सात विभागांद्वारे प्राचीन परिसंस्था, उत्क्रांतीची प्रक्रिया आणि मोठ्या प्रमाणात विलुप्त होण्याच्या घटनांचा मागोवा दर्शकांना घेता येतो. जीवाश्म आणि विसर्जित स्वरूपाचा परिणाम दाखवणारी प्रदर्शने वैज्ञानिक कुतूहल वाढवतात, जे आपल्या भूतकाळाचे सखोल आकलन आणि भविष्याकडे पाहण्याची दृष्टी प्रदान करतात.

उपराष्ट्रपतींसह मान्यवरांनी दोन्ही गॅलरींना भेट देत जीएसआयच्या वैविध्यपूर्ण  प्रदर्शनाचे आणि भूविज्ञानाच्या झळाळत्या प्रदर्शनाचे कौतुक केले आणि आपल्या देशाची भूवैज्ञानिक संपत्ती शोधण्यात आणि समजून घेण्यात तसेच सखोल वैज्ञानिक ज्ञान प्रदान करण्याच्या उद्देशाने  शाश्वत संसाधन व्यवस्थापनास समर्थन देण्यात आणि राष्ट्राच्या विकासात योगदान देण्यात आघाडीवर असलेल्या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. त्यांनी या संग्रहालयाला जीएसआयच्या अतूट वचनबद्धतेचे आणि कौशल्याचे झळाळते  प्रतिबिंब म्हणून अधोरेखित केले.

About Matribhumi Samachar

Check Also

आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडियातर्फे छत्रपती संभाजीनगर येथे जैवविविधता उद्यानाचे उद्घाटन

या उपक्रमांतर्गत स्थानिक प्रजातींची मोठ्या प्रमाणावर लागवड, फुलपाखरू उद्यान आणि औषधी वनस्पतींची बाग, सौरऊर्जेवर चालणारे …