Sunday, December 07 2025 | 06:14:35 AM
Breaking News

“विरासत”- भारतातील हाताने विणलेल्या साड्यांचा उत्सव

Connect us on:

भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे येत्या 15 ते 28 डिसेंबर 2024 या कालावधीत हँडलूम हाट, जनपथ, नवी दिल्ली येथे “विरासत साडी महोत्सव 2024” या भव्य कार्यक्रमाची तिसरी आवृत्ती आयोजित करण्यात येत आहे.

“विरासत साडी महोत्सव 2024” च्या तिसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने देशाच्या विविध भागांतील हातमाग साड्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल आणि देशभरातील हातमाग विणकर, साडी डिझाइनर आणि साडी प्रेमी आणि खरेदीदारांना एकत्र आणण्याचा उद्देश आहे. या कार्यक्रमात भारतातील हातमाग वारसा प्रदर्शित केला जाणार आहे.

या आयोजनात, हातमाग क्षेत्राची परंपरा आणि क्षमता या दोन्ही गोष्टी साजरा केल्या जातील. या कार्यक्रमामुळे साडी विणण्याच्या जुन्या परंपरेवर पुन्हा लक्ष केंद्रित केले जाईल आणि त्याद्वारे हातमाग समुदायाच्या उत्पन्नात  सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये

  • स्थानिक हातमाग आणि हस्तकलेच्या वस्तूंची थेट किरकोळ विक्री करण्यासाठी हातमाग विणकर आणि कारागिरांसाठी 80 स्टॉल्स.
  • भारतातील उत्कृष्ट हातमाग साड्यांचे ‘क्युरेटेड थीम’ प्रदर्शन
  • हातमाग आणि हस्तकला संबंधी प्रात्यक्षिके
  • साड्या आणि शाश्वतता संबंधी कार्यशाळा आणि चर्चासत्र
  • भारतातील लोकनृत्य
  • स्वादिष्ट प्रादेशिक पाककृती

उत्पादनांचे वेगळेपण अधोरेखित करण्याबरोबरच उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना वेगळी ओळख देण्यासाठी शून्य दोष असलेल्या आणि पर्यावरणावर शून्य प्रभाव असलेल्या उच्च दर्जाच्या उत्पादनांच्या ब्रँडिंगसाठी हातमागासाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. खरेदी केलेले उत्पादन खरोखर हाताने विणलेले आहे अशी हमी देखील हे खरेदीदाराला देते

“विरासत – माय साडी माय प्राइड” साडी महोत्सव आणि प्रदर्शन १५ ते २८ डिसेंबर २०२४ पर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी खुले असेल.

About Matribhumi Samachar

Check Also

पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल दिनाच्या वार्षिक पत्रकार परिषदेत माध्यमांशी साधला संवाद

मुंबई , 2 डिसेंबर 2025 व्हाइस ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन, एव्हीएसएम एनएम, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ वेस्टर्न …