Saturday, January 03 2026 | 06:59:11 PM
Breaking News

पंतप्रधान 17 डिसेंबरला राजस्थानला भेट देणार

Connect us on:

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 डिसेंबर 2024 रोजी राजस्थानला भेट देणार आहेत. एक वर्ष-परिणाम उत्कर्ष या राजस्थान सरकारच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात पंतप्रधान  सहभागी होणार आहेत. यावेळी ते राजस्थानमध्ये जयपूर येथे ऊर्जा, रस्ते, रेल्वे आणि पाणी यांच्याशी संबंधित 46,300 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या 24 प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

पंतप्रधान 11,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या 9 प्रकल्पांचे उद्घाटन करतील ज्यात केंद्र सरकारचे 7  प्रकल्प आणि  राज्य सरकारचे 2 प्रकल्प आहेत. पंतप्रधान 35,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या 15 प्रकल्पांची पायाभरणी करतील ज्यात केंद्र सरकारचे  9 प्रकल्प आणि  राज्य सरकारचे 6 प्रकल्प आहेत.

कार्यक्रमादरम्यान उद्घाटन होणाऱ्या प्रकल्पांमध्ये नवनेरा बॅरेज, स्मार्ट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन नेटवर्क आणि ॲसेट मॅनेजमेंट सिस्टम प्रकल्प, भिल्डी- समदरी-लुनी-जोधपूर-मेर्टा रोड-देगाणा-रतनगड विभागाचे रेल्वे विद्युतीकरण आणि दिल्ली-वडोदरा ग्रीन फील्ड अलाइनमेंट पॅकेज 12 (NH-148N) (SH-37A सह जंक्शनपर्यंत मेज नदीवरील मोठा पूल) यांचा समावेश आहे. पंतप्रधानांच्या हरित ऊर्जेच्या संकल्पनेच्या अनुषंगाने हे प्रकल्प लोकांना सुलभ प्रवास करण्यास आणि राज्याच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करतील.

रामगड बॅरेज आणि महालपूर बॅरेजच्या बांधकामासाठी आणि चंबळ नदीवरील जलवाहिनीद्वारे नवनेरा बॅरेजमधून बिसलपूर धरण आणि इसर्डा धरणात पाणी हस्तांतरित करण्याच्या 9,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या यंत्रणेची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत.

सरकारी कार्यालयांच्या इमारतींच्या छतांवर सौर उर्जा सयंत्र बसवणे, पूगल (बिकानेर) येथे 2000 मेगावॅटचा एक सोलर पार्क आणि 1000 मेगावॅट सोलर पार्कचे दोन टप्पे आणि सायपाऊ (धोलपूर) ते भरतपूर-देग-कुम्हेर-नगर-कामाण आणि पहाडी आणि चंबळ-धोलपूर-भरतपूर पर्यंत पेयजल पुरवठा वाहिनीच्या रेट्रोफिटिंग कामाच्या प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. लुनी-समदरी-भिलडी दुहेरी मार्ग, अजमेर-चंदेरिया दुहेरी मार्ग आणि जयपूर-सवाई माधोपूर दुहेरी मार्ग रेल्वे प्रकल्प तसेच ऊर्जा पारेषणाशी संबंधित इतर प्रकल्पांसाठी ते पायाभरणी करतील.

About Matribhumi Samachar

Check Also

ए. के. बालासुब्रमणयन यांनी स्वीकारली मुंबईतील अणुऊर्जा नियामक परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे

प्रख्यात शास्त्रज्ञ ए. के. बालासुब्रमणयन यांनी  01   जानेवारी  2026  रोजी मुंबईतील अणुऊर्जा नियामक परिषद  (एईआरबी) अध्यक्षपदाची सूत्रे …