पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमवरील पोस्ट मध्ये लिहिले आहे :
“प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेनजी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. भारतीय शास्त्रीय संगीतजगात खऱ्या अर्थानं क्रांती घडवणारा प्रतिभावंत म्हणून ते कायम स्मरणात राहतील. त्यांनी तबलावादनाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली आणि आपल्या अप्रतिम तालाने लाखो लोकांना मंत्रमुग्ध केले. यामाध्यमातून भारतीय शास्त्रीय संगीत आणि वैश्विक संगीताचा सुंदर मिलाफ घडवून ते सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक बनले.
संगीतकार आणि संगीत प्रेमींच्या अनेक पिढ्यांना, त्यांचे अद्वितिय सादरीकरण आणि भावपूर्ण रचना प्रेरणा देतील. त्यांचे कुटुंब, मित्र आणि जागतिक संगीत समुदायाच्या दुःखात मी सहभागी आहे.”
भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

