नागपूरच्या छिंदवाडा रोड स्थित राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी – एनएडीटी येथे भारतीय महसूल सेवा आयआरएसच्या 78 व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचे सेवा पूर्व प्रशिक्षणाचे उद्घाटन 17 डिसेंबर मंगळवारी दुपारी 12 वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे.
नॅशनल ॲकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस ही केंद्र शासनाच्या भारतीय महसूल सेवा अधिकाऱ्यांसाठी (आयकर) सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी द्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षा द्वारे आयआरएस अधिकाऱ्यांची भरती केली जाते. थेट भर्ती झाललेले हे अधिकारी क्षेत्रीय कार्यालयात नियुक्ती करण्यापूर्वी एनएडीटी, नागपूर येथे 16 महिन्यांचे सेवा पूर्व प्रशिक्षण पुर्ण करतात.
78 व्या तुकडीच्या नवीन बॅचमध्ये रॉयल भूतान सर्व्हिसच्या 02 अधिकाऱ्यांसह 145 अधिकारी प्रशिक्षणार्थी आहेत.
काळजीपूर्वक नियोजित अभ्यासक्रम प्रशिक्षणातील सहभागींना त्यांच्या भूमिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आणि राष्ट्राच्या विकासात प्रभावीपणे योगदान देण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि मानसिकतेसह सुसज्ज करतो.
इंडक्शन ट्रेनिंगची प्रशिक्षण पद्धत “विकसित भारत” या संकल्पनेवर आधारित आहे, पंतप्रधानांच्या दूरदृष्टीनुसार, अधिका-यांमध्ये उत्कृष्टता, उत्तरदायित्व आणि नवोपक्रमाची संस्कृती वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. कार्यक्रमात वर्ग सत्रे, व्यायाम, केस स्टडी आणि परस्पर चर्चा यांचे मिश्रण समाविष्ट आहे, ज्यामध्ये कर प्रशासन, नेतृत्व आणि सार्वजनिक सेवेच्या विविध पैलूंचा समावेश आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध संस्थांचे प्रमुख अधिकारी आणि आयकर विभाग, नागपूरचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती एनएडीटी व्दारे देण्यात आली आहे
Matribhumi Samachar Marathi

