Tuesday, December 09 2025 | 11:28:52 AM
Breaking News

सर्वात मोठे पर्यटन केंद्र म्हणून भारताचे रूपांतर

Connect us on:

युएनडब्ल्युटीओ  बॅरोमीटर  (मे 2024) अर्थात संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संस्थेनुसार, 2023* या वर्षात आंतरराष्ट्रीय पर्यटक आगमन आकडेवारी नुसार भारत जागतिक स्तरावर 24 व्या क्रमांकावर होता. या कालावधीत, भारतात 18.89 दशलक्ष  आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे आगमन नोंदवले गेले, जे 2022 मधील 14.33 दशलक्षच्या तुलनेत 31.9% ची लक्षणीय वाढ दर्शविते.

*काही देशांमधील डेटा गहाळ झाल्यामुळे 2023 ची क्रमवारी तात्पुरती आहे.

भारताला जगातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र बनवण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने अनेक पावले उचलली आहेत, ती पुढील प्रमाणे : 

  • पर्यटन मंत्रालय ‘स्वदेश दर्शन’, ‘तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन मोहीमेचे राष्ट्रीय मिशन (प्रशाद)’ आणि ‘पर्यटन पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्रीय संस्थांना सहाय्य’ या योजनांअंतर्गत, राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना आणि केंद्रीय संस्थांना देशातील विविध पर्यटन स्थळांवर पर्यटनाशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि सुविधांच्या निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य पुरवते.
  • पर्यटन मंत्रालय आपल्या विविध मोहिमा आणि कार्यक्रमांद्वारे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतातील विविध पर्यटन स्थळे आणि उत्पादनांना प्रोत्साहन देते. देखो अपना देश अभियान, चलो इंडिया अभियान, आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यापारी पेठ, भारत पर्व हे त्यापैकी काही उपक्रम आहेत.
  • इनक्रेडिबल इंडिया कंटेंट हब सुरु करण्यात आले आहे, जे एक व्यापक डिजिटल भांडार असून  त्यात उच्च-गुणवत्तेची छायाचित्रे, माहितीपट, माहितीपत्रके आणि भारतातील पर्यटनाशी संबंधित वृत्तपत्रे यांचा समृद्ध संग्रह आहे. www.incredibleindia.org  या संकेतस्थळावरून आणि मंत्रालयाच्या सोशल मीडिया हँडलद्वारे देखील प्रचार केला जातो.
  • आरोग्यासंबंधी पर्यटन, खाद्य संस्कृती पर्यटन, ग्रामीण, पर्यावरण पर्यटन इत्यादी संकल्पनांवर आधारित पर्यटनाला प्रोत्साहन दिले जाते जेणेकरुन पर्यटनाची व्याप्ती इतर क्षेत्रांमध्येही वाढवता येईल.
  • क्षमता निर्माण, कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित केलेल्या उपक्रमांद्वारे एकूण गुणवत्ता आणि पर्यटक पाहुण्यांना सुखद अनुभव मिळावा यासाठी ‘सेवा प्रदात्यांची क्षमता वाढवणे’ ‘अतुल्य इंडिया टुरिस्ट फॅसिलिटेटर’ (IITF), ‘पर्यटन मित्र’ आणि ‘पर्यटन दीदी’ यासारखे उपक्रम राबवले जात आहेत.
  • महत्त्वाच्या पर्यटन स्थळांशी हवाई संपर्क सुविधा सुधारण्याच्या उद्देशाने, पर्यटन मंत्रालयाने त्यांच्या आरसीएस – उडान योजनेअंतर्गत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाशी सहकार्य केले आहे. त्यानुसार आजपर्यंत 53 पर्यटन मार्ग कार्यान्वित झाले आहेत.
  • ई-व्हिसा योजना आता 168 देशांसाठी उपलब्ध आहे आणि ती खालील 7 उप-श्रेणींसाठी उपलब्ध आहे:
  1. ई-पर्यटन व्हिसा
  2. ई-व्यवसाय व्हिसा
  3. ई-वैद्यकिय व्हिसा
  4. ई-परिषद व्हिसा
  5. ई-वैद्यकिय मदतनीस व्हिसा
  6. ई-आयुष व्हिसा
  7. ई-आयुष मदतनीस व्हिसा

केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

About Matribhumi Samachar

Check Also

वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित विशेष चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2025. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित …