फ्रान्समधील मायोटमध्ये चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,की भारत फ्रान्ससोबत खंबीरपणाने उभा आहे आणि सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्स खंबीरपणे आणि दृढनिश्चयाने या आपत्तीवर मात करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एक्स पोस्टवर त्यांनी लिहिले आहे:
“मायोट मध्ये चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसामुळे खूप दुःख झाले.माझ्या संवेदना आणि प्रार्थना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. मला विश्वास आहे की राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाखाली, फ्रान्स खंबीरपणे आणि दृढनिश्चयाने या आपत्तीवर मात करेल. भारत फ्रान्ससोबत खंबीरपणे उभा आहे आणि सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.”
भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

