कर्नाटकातील आदरणीय पर्यावरणवादी आणि पद्म पुरस्कार प्राप्त श्रीमती तुलसी गौडा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज दुःख व्यक्त केले.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“कर्नाटकातील आदरणीय पर्यावरणवादी आणि पद्म पुरस्कारप्राप्त श्रीमती तुलसी गौडा जी,यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले आहे.आपले संपूर्ण जीवन त्यांनी,हजारो रोपे लावून निसर्गाचे संगोपन करत आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी समर्पित केले. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव मार्गदर्शक प्रकाश देत राहील.त्यांचे कार्य आपल्या पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि चाहत्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो
ओम शांती
भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

