Sunday, January 11 2026 | 03:39:58 PM
Breaking News

सी-डॉट आणि सिलिझियम सर्किट्स यांच्यात “LEO उपग्रह घटकांचे डिझाइन आणि विकास आणि ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम आर एफ फ्रंट एंड एप्लीकेशन स्पेसिफिक इंटीग्रेटेड सर्किट्स” साठी करार

Connect us on:

स्वदेशात तयार केलेले अत्याधुनिक आणि पुढील पिढीचे दूरसंवाद तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, भारत सरकारच्या दूरसंचार विभागाअंतर्गत असलेले प्रमुख दूरसंचार संशोधन आणि विकास केंद्र,  सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (सी-डॉटचे) आणि आय आय टी हैदराबाद अंतर्गत फॅबलेस सेमीकंडक्टर आयपी आणि एसओसी स्टार्टअप सिलिझियम सर्किट्स प्रायव्हेट लिमिटेड, एफएबीसीआय (चिप डिझाइन इनक्यूबेटर) या विभागाअंतर्गत एक करार करण्यात आला आहे.  “LEO उपग्रह घटक आणि ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम आर एफ फ्रंट एंड एप्लीकेशन स्पेसिफिक इंटीग्रेटेड सर्किट्सचे डिझाइन आणि विकासासाठी” हा करार करण्यात आला आहे.

भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या दूरसंचार तंत्रज्ञान विकास निधी (टीटीडीएफ) योजनेअंतर्गत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. ही योजना, भारतीय स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि संशोधन आणि विकास संस्थांना निधी देण्यासाठी आखण्यात आली असून, दूरसंचार उत्पादने आणि उपायांची रचना, विकास आणि त्यांचे व्यापारीकरण करण्यासाठी ती एक महत्त्वपूर्ण योजना आहे.

सिलिझियम सर्किट्स दूरसंचार तंत्रज्ञान विकास निधीच्या साहाय्याने LEO उपग्रह घटकांसाठी प्रगत अर्धसंवाहक उपाय विकसित करण्यासाठी सज्ज आहेत.

LEO उपग्रह पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विस्तृत श्रेणीला समर्थन देणे हे यामागील उद्दिष्ट असून जागतिक बाजारपेठ तसेच  आत्मनिर्भर भारत आणि भविष्याच्या दृष्टीने सज्ज असा उपग्रह संप्रेषण नेटवर्क हा दृष्टिकोन समोर ठेवून हा करार करण्यात आला आहे. या माध्यमातून देशाच्या शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये कनेक्टिव्हिटी – संपर्कव्यवस्था वाढीला लागून अत्याधुनिक ब्रॉडबँड सेवा वितरित करता येऊ शकेल.

सी-डॉटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजकुमार उपाध्याय, सिलिझियम सर्किट्सचे सह-संस्थापक आणि सीईओ रिजिन जॉन, सी-डॉटचे संचालक डॉ. पंकज कुमार दलाला आणि शिखा श्रीवास्तव, सी-डॉटचे वरिष्ठ अधिकारी, उपमहासंचालक -दूरसंचार तंत्रज्ञान विकास निधी (टीटीडीएफ ) डॉ. पराग अग्रवाल, उपमहासंचालक (एस आर आय) विनोद कुमार, यांच्या उपस्थितीत एका समारंभात या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

दूरसंवाद क्षेत्रातील आवश्यकतेनुसार स्वत:च्या चिप्स विकसित करण्याचे महत्त्व डॉ. राजकुमार उपाध्याय यांनी अधोरेखित केले आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान सी डॉट सर्व पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी सहाय्य करेल अशी ग्वाही दिली.

About Matribhumi Samachar

Check Also

एडीएद्वारे आयोजित दोन दिवसीय ‘एअरोनॉटिक्स 2047’राष्ट्रीय चर्चासत्राला बंगळुरुमध्ये प्रारंभ

एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए) द्वारे आयोजित ‘एअरोनॉटिक्स 2047’या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला  बंगळुरूच्या सेंटर फॉर एअरबोर्न …