केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील महिलांच्या तुकडीची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
(i) वरिष्ठ महिला कमांडंटच्या नेतृत्वाखालील विविध श्रेणीपैकी महिला राखीव तुकडीची क्षमता 1,025 आहे.
(ii) विमानतळ, दिल्ली मेट्रो, सरकारी इमारतींची सुरक्षा, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादींवरील सुरक्षा कर्तव्यांसाठी जिथे महिलांची आवश्यकता असते अशा ठिकाणी महिला राखीव तुकडी कार्यरत राहू शकेल.
(iii) दलातील महिलांच्या प्रतिनिधीत्वात वाढ.
(iv) केंद्र सरकारने सोपवलेली इतर कर्तव्ये पार पाडणे.
सीआयएसएफ जवानांच्या वेगवेगळ्या श्रेणीतील प्रशिक्षण कार्यक्रम, कालावधी आणि अभ्यासक्रम मंजूर नियमांनुसार केले जातात.
महिला तुकडीच्या विविध पदांची भरती त्यांच्या नियुक्तीच्या नियमांनुसार थेट भरती किंवा पदोन्नतीद्वारे केली जाते.
केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
Matribhumi Samachar Marathi

