राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC), भारतातील पदव्युत्तर-स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी 4 आठवड्यांचा वैयक्तिक हिवाळी कार्यानुभव कार्यक्रम -2024 सुरू केला आहे. देशातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील विविध शैक्षणिक विषयांतील 80 विद्यार्थी यात सहभागी होत आहेत. 1,000 हून अधिक अर्जदारांमधून त्यांची निवड करण्यात आली.

या उपक्रमाचे उदघाटन करताना,राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या(NHRC),अध्यक्ष ,विजया भारती सयानी यांनी सर्व विद्यार्थ्यांना भारतातील मानवाधिकारांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या कार्यासाठी विचार करण्याचे आवाहन केले.

आपल्या भाषणात, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे , सरचिटणीस, श्री भरत लाल यांनी या प्रतिष्ठित कार्यानुभव उपक्रमासाठी त्यांच्या झालेल्या निवडीबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना जास्तीत जास्त शिकण्यासाठी आणि सामाजिक समस्यांबद्दल संवेदनशीलता विकसित करण्यासाठी आणि सहानुभूतीने त्याला प्रतिसाद देण्यासाठी या संधीचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले.

एनएचआरसीचे सहसचिव श्री देवेंद्र के. निम यांनी या हिवाळी कार्यानुभव कार्यक्रमाचे विहंगावलोकन करताना आयोगाची कार्यप्रणाली आणि मानवी हक्कांच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी आयोग करत असलेल्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला.

या कालावधीत, विद्यार्थ्यांना विषय तज्ञांद्वारे मानवी हक्कांच्या विविध पैलूंबद्दल माहिती दिली जाईल तसेच शिवाय त्यांना विविध ठिकाणी क्षेत्र भेटीसाठी देखील नेले जाईल.

Matribhumi Samachar Marathi

