Wednesday, December 10 2025 | 04:12:42 PM
Breaking News

ऑक्टोबर 2024 मध्ये 17.80 लाख नवीन कर्मचाऱ्यांची ईएसआय (ESI) योजनेंतर्गत नोंदणी

Connect us on:

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) तात्पुरत्या वेतनपट अहवालानुसार, ऑक्टोबर 2024 मध्ये 17.80 लाख नवीन कर्मचारी महामंडळाशी जोडले गेल्याचे दिसून आले आहे.

ऑक्टोबर, 2024 मध्ये 21,588 नवीन आस्थापना ईएसआयसी योजनेच्या सामाजिक सुरक्षा कक्षेत आणल्या गेल्या. त्यामुळे अधिक कामगारांना सामाजिक सुरक्षेचे कवच प्रदान करण्यात आले.

ऑक्टोबर 2023 च्या तुलनेत एकूण नोंदणीमध्ये 3% वृद्धी झाल्याचे वार्षिक विश्लेषण दर्शवत आहे.

Year on Year Comparison
Head October 2023 October 2024 Growth
Number of New employees registered during the month 17.28 Lakh 17.80 Lakh 0.52 Lakh

आकडेवारीवरून असे लक्षात येते की, या महिन्यात महामंडळाशी जोडल्या गेलेल्या एकूण नोंदणीकृत 17.80 लाख कर्मचाऱ्यांपैकी 8.50 लाख, म्हणजेच सुमारे 47.75% कर्मचारी 25 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील आहेत.

त्याचप्रमाणे वेतनपट अहवालाचे लिंगनिहाय विश्लेषण असे सूचित करते की, ऑक्टोबर 2024 मध्ये महिला सदस्यांची एकूण नोंदणी 3.52 लाख इतकी होती. याशिवाय, ऑक्टोबर 2024 मध्ये एकूण 42 ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांनी ईएसआय योजनेंतर्गत नोंदणी केली असून, यामधून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्याप्रति असलेली ईएसआयसी ची वचनबद्धता स्पष्ट होते.

डेटा (विदा) निर्मिती ही निरंतर प्रक्रिया असल्यामुळे वेतनपट अहवाल तात्पुरता आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

संचार लेखा नियंत्रक कार्यालयात पणजी येथे पेन्शन अदालतचे आयोजन

पणजी, 9 ऑक्टोबर 2025. संचार लेखा नियंत्रक (सीसीए), महाराष्ट्र आणि गोवा कार्यालयाने आज 9 डिसेंबर …