Thursday, January 08 2026 | 12:00:33 PM
Breaking News

राष्ट्रीय महामार्गावर मेटल बीम क्रॅश बॅरियर बसवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपाययोजना करत आहे

Connect us on:

रस्ते सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने एनएचएआयने कंत्राटदारांना निर्दिष्ट केलेल्या मानकांनुसार राष्ट्रीय महामार्गावर मेटल बीम क्रॅश बॅरियर स्थापित करण्यासाठी परिभाषित मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश जारी केले आहेत.

रस्ते सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकामाची गुणवत्ता वाढविण्यासाठी, निर्दिष्ट मानकांनुसार राष्ट्रीय महामार्गावर मेटल बीम क्रॅश बॅरियर स्थापित करण्यासाठी वाहतूक सुरक्षा अडथळ्यांबाबत इंडियन रोड काँग्रेस आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी एनएचएआयने कंत्राटदारांना निर्देश जारी केले आहेत.

सवलतदार/कंत्राटदाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की क्रॅश बॅरियरसाठी पुरवठा केलेली सामग्री क्रॅश चाचणी अहवालात दिलेल्या तपशीलांप्रमाणे असावी आणि ती निर्मात्याने प्रदान केलेल्या पद्धतीनुसार स्थापित केली जावी असे निर्देशांमध्ये समाविष्ट केले आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी स्थापित क्रॅश बॅरियर विहित डिझाइन, मानके आणि वैशिष्ट्यांनुसार आहे, असे प्रमाणपत्र सवलतधारक/कंत्राटदाराने निर्मात्याकडून प्राप्त केले पाहिजे. याव्यतिरिक्त, ग्राउंड लेयर कॉम्पॅक्शनची इच्छित पातळी देखील सवलतधारक/कंत्राटदाराने सुनिश्चित केली पाहिजे.

त्यामध्ये मेटल बीम क्रॅश बॅरियर उत्पादकांना दिलेल्या निर्देशांचा देखील समावेश आहे ज्यात मेटल बीम क्रॅश बॅरियरच्या प्रत्येक घटकावर ब्रँडचे नाव, लॉट/बॅच नंबर, स्टीलचा दर्जा आणि इतर संबंधित तपशील एम्बॉस करून त्यांच्या उत्पादनाची ओळख सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे.

निर्मात्याने मेटल बीम क्रॅश बॅरियरवर एक QR कोड देखील प्रदान केला पाहिजे ज्याद्वारे मेटल बीम क्रॅश बॅरियरच्या स्थापनेसाठीची मार्गदर्शक प्रणाली/पद्धत, प्रकल्प स्थळी कोणालाही सहज बघता येईल. याव्यतिरिक्त, मेटल बीम क्रॅश बॅरियर मंजूर करताना, प्राधिकरण अभियंता/स्वतंत्र अभियंता हे सुनिश्चित करेल की सर्व तांत्रिक तपशील क्रॅश चाचणी अहवालात परिभाषित केलेल्या डिझाइन मानकांची पूर्तता करतात की नाही.

एनएचएआय  राष्ट्रीय महामार्ग बांधकामातील सर्वोच्च मानके साध्य करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि ही मार्गदर्शक तत्त्वे चांगल्या दर्जाचे प्रकल्प सादर करण्यासाठी कंत्राटदार/सवलतधारकांची जबाबदारी तर वाढवतीलच शिवाय देशभरातील राष्ट्रीय महामार्ग प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासही मदत करतील.

About Matribhumi Samachar

Check Also

आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेने नवी दिल्ली येथे साजरा केला चौथा स्थापना दिन

भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून …