नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024
हवाई दलाचे प्रमुख,एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी 18 ते 19 डिसेंबर 2024 या दरम्यान सीएसी कमांडर्स परिषद 2024 साठी सेंट्रल एअर कमांड (सीएसी) च्या मुख्यालयाला भेट दिली.सेंट्रल एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी त्यांचे स्वागत केले.एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांचे आगमन होताच त्यांना मानवंदना देण्यात आली.
परिषदेदरम्यान, हवाई दल प्रमुखांनी सेंट्रल एअर कमांड मधील एअर ऑपरेशन्स रुटीन ऑर्डर (एओआर) च्या कमांडर्सशी संवाद साधला आणि भारतीय हवाई दलाची परिचालन क्षमता वाढविण्यासाठी आपली भूमिका जाणण्याचे महत्त्व अधोरेखित केले. हवाई दल प्रमुखांनी कमांडर्सना सध्याची सुरक्षा परिस्थिती, भारतीय हवाई दलाची महत्त्वपूर्ण भूमिका याविषयी माहिती दिली तसेच नव्याने सामोऱ्या येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी उच्च तत्परता आणि सतर्कता राखण्याच्या गरजेवर भर दिला. परिचालन सज्जता वाढविण्यासाठी, निगराणी पद्धतींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि मजबूत भौतिक तसेच सायबर सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण विश्लेषणाच्या गरजेवर सिंह यांनी भर दिला.कमांडर्सनी सुरक्षित कार्यक्षम उड्डाण वातावरण सुनिश्चित करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवावेत असे आवाहन त्यांनी केले. तसेच, नवोन्मेष आणि स्वावलंबनाद्वारे भारतीय हवाई दलाची लढाऊ क्षमता वाढवण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.हवाई दल प्रमुखांनी आपल्या भाषणात,भारतीय हवाई दल स्तरीय सराव, मानवतावादी सहाय्य आपत्ती निवारण (HADR) कार्य आणि नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी तसेच भारतीय हवाई दलाचे मिशन, अखंडता आणि उत्कृष्टतेची मूलभूत मूल्ये सर्वोच्च ठेवण्यासाठी सीएसी च्या भूमिकेचे कौतुक केले.



Matribhumi Samachar Marathi

