नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024
केंद्रीय श्रम व रोजगार आणि युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी राज्य विमा महामंडळ –‘ईएसआयसी’ची 195 वी बैठक आज नवी दिल्ली इथे श्रम शक्ती भवनात झाली.
वित्तीय वर्ष 2023-24 च्या ईएसआयसीच्या वार्षिक अहवाल आणि जमाखर्चाचे लेखापरीक्षण
महामंडळाचा वित्तीय वर्ष 2023-24 मधील जमाखर्चासह कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांचा अहवाल आणि विश्लेषणासह वार्षिक अहवालाला मंजुरी देत महामंडळाने तो स्वीकारला.

वर्ष 2024-25 साठी सुधारित अंदाजपत्रक, वर्ष 2025-26 साठी नियोजित जमा-खर्च आणि 2025-26 साठी कामगिरी अंदाजपत्रक
ईएसआयसीने वित्तीय वर्ष 2024-25 साठी सुधारित अंदाजपत्रक, वित्तीय वर्ष 2025-26 साठी नियोजित जमा-खर्च आणि कामगिरी अंदाजपत्रकलाही मंजुरी दिली. ही आर्थिक अंदाजपत्रके आगामी काळासाठी महामंडळाचा अनुमानित खर्च, निधी वाटप आणि कामगिरीसाठी उद्दीष्टांची आखणी करतात. महामंडळाने त्यांचे परीक्षण करून त्यातील अद्ययावत आर्थिक उद्दीष्टांसह त्यासाठी निधी, योग्य संसाधन व्यवस्थापन, महामंडळाच्या दूरगामी ध्येयांशी आणि संबंधित काळासाठी कार्यान्वयन गरजांशी संलग्नता असल्याची खात्री करून घेतल्याचे त्यांना मिळालेली मंजुरी दर्शवते.

Matribhumi Samachar Marathi

