नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024
जागतिक आर्थिक मंचाद्वारे प्रकाशित पर्यटन आणि पर्यटन विकास सूची 2024 च्या अहवालानुसार, 119 देशांमध्ये भारत 39 व्या स्थानावर आहे.2021 मध्ये प्रकाशित झालेल्या निर्देशांकात भारत 54 व्या क्रमांकावर होता.तथापि, जागतिक आर्थिक मंचाच्या कार्यपद्धतीतील सुधारणेनंतर 2021 साली भारताचे स्थान 38 वे झाले होते.
‘स्वदेश दर्शन’,’नॅशनल मिशन ऑन पिलग्रिमेज रिजुवनेशन अँड स्पिरिच्युअल हेरिटेज ऑगमेंटेशन ड्राइव्ह (प्रसाद)’ केंद्रीय संस्थांना सहाय्य’ अशा विविध योजनांद्वारे ‘पर्यटन पायाभूत सुविधा विकासासाठी पर्यटन मंत्रालय राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश/प्रशासनांना देशातील विविध पर्यटन स्थळांसाठी,पर्यटनाशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आर्थिक सहाय्य पुरवते
मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने वैद्यकीय पर्यटन सुविधा (मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल,MVT) या नावाने भारताचे अधिकृत पोर्टल सुरू केले आहे, ज्यामुळे भारतात वैद्यकीय सेवांचा लाभ मिळणे सुनिश्चित होत आहे. हे एक “वन-स्टॉप” पोर्टल असून परदेशातून भारतात वैद्यकीय उपचार घेऊ इच्छिणाऱ्यांच्या माहिती सुविधेसाठी हे विकसित केले आहे. भारतात वैद्यकीय सेवा किंवा आरोग्य सेवा शोधणारा कोणताही आंतरराष्ट्रीय रुग्ण www.healinindia.gov.in वर लॉग इन करून ‘ॲडव्हांटेज हेल्थकेअर इंडिया पोर्टलला’ भेट देऊ शकतो.
केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
Matribhumi Samachar Marathi

