कुवेतमध्ये स्थायिक उत्साही भारतीय समुदायाने हृदयस्पर्शी स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांची ऊर्जा, प्रेम आणि त्याचे भारतासोबत असलेले अतूट नाते खरोखरच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी कुवेतमध्ये श्री मंगल सेन हांडा जी यांचीही भेट घेतली. या भेटीबद्दलही पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
कुवेतमधील स्थायिक उत्साही भारतीय समुदायाने हृदयस्पर्शी स्वागत केले.
त्यांची ऊर्जा, प्रेम आणि भारतासोबत असलेले अतूट नाते खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या उत्साहाबद्दल आभारी आहे आणि आपल्या परस्परांच्या देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा अभिमान आहे.
कुवेतमध्ये आज दुपारी श्री @MangalSainHanda जी यांना भेटून आनंद झाला. भारतासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची आणि भारताच्या विकासासाठी त्यांच्या तळमळीची मी आदरपूर्वक प्रशंसा करतो.
Matribhumi Samachar Marathi

