Monday, December 08 2025 | 06:43:23 AM
Breaking News

कुवेत दौऱ्यावर रवाना होणापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन

Connect us on:

कुवेतचे अमीर अमीर शेख मेशाल अल – अहमद अल – जाबेर अल – सबाह यांच्या निमंत्रणावरून आज मी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर रवाना होत आहे.

गेल्या अनेक पिढ्यांपासून कुवेतसोबत जपल्या गेलेले ऐतिहासिक नाते खूपच महत्वाचे असल्याचेच आम्ही मानतो. आम्ही केवळ व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातील मजबूत भागीदार नाही, तर पश्चिम आशिया क्षेत्रातील शांतता, सुरक्षा, स्थैर्य आणि समृद्धीमध्येही आमचे परस्पर सामायिक हित संबंध आहेत.

महामहिम अमीर, युवराज आणि कुवेतचे पंतप्रधान यांच्यासोबत होणाऱ्या भेटींसांठी मी उत्सुक आहे. आपले लोक आणि या क्षेत्राच्या हिताच्या दृष्टीने भविष्यकालीन भागीदारीचा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने ही एक संधी असेल.

ज्यांनी दोन्ही देशांमधील मैत्रीचे बंध दृढ करण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे, अशा कुवेतमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय समुदायाला भेटण्यासाठी देखील मी प्रचंड उत्सुक आहे.

आखाती प्रदेशामधील एक प्रमुख क्रीडा स्पर्धा असलेल्या अरबी गल्फ कप या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी, कुवेतच्या नेतृत्वाने मला सौहार्दपणे निमंत्रित केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. अॅथलेटिकमधील उत्कृष्टता आणि प्रादेशिक एकतेच्या या उत्सवाचा एक भाग होण्यासाठीही मी उत्सुक आहे.

मला खात्री आहे की या भेटीमुळे भारत आणि कुवेमधील लोकांमधले विशेष संबंध आणि मैत्रीचे बंध अधिक दृढ होतील.

About Matribhumi Samachar

Check Also

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन

महामहीम, माझे मित्र राष्ट्रपती पुतीन दोन्ही देशांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे सहकारी नमस्कार! “दोबरी देन”! आज भारत …