Thursday, January 01 2026 | 01:00:24 AM
Breaking News

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी 100 दिवसांच्या व्यापक क्षयरोग निर्मूलन मोहिमेबाबत मुख्यमंत्र्यांसोबत घेतली बैठक

Connect us on:

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज, 100 दिवसांच्या व्यापक क्षयरोग निर्मूलन मोहिमेसंदर्भात देशातील मुख्यमंत्री/ नायब राज्यपाल आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य मंत्री यांची दूरदृश्य प्रणालीमार्फत दिल्लीत बैठक घेतली आणि या मोहिमेला पाठिंबा देण्याची विनंती केली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव या बैठकीत दुरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

नड्डा यांनी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी राज्य पातळीवर मोहिमेवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आणि जिल्हा स्तरावरील राजकीय आणि प्रशासकीय नेतृत्वाने देखील त्याची खात्री करून घ्यावी, असे सांगितले. त्यांनी संपूर्ण-सरकारी दृष्टीकोन सुनिश्चित करावा असे सुचवले.  इतर मंत्रालये आणि विभागांना राष्ट्रीय स्तरावर घेतलेल्या दृष्टिकोनाप्रमाणेच मोहिमेअंतर्गत उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे, असे सांगितले.

भारतातील क्षयरोग घटण्याचे प्रमाण 2015 मधील 8.3% वरून दुप्पट होऊन 17.7% झाले आहे, जे जागतिक सरासरीपेक्षा खूप पुढे आहे, असे नड्डा यांनी अधोरेखित केले. गेल्या 10 वर्षात भारतात क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 21.4 टक्क्यांनी लक्षणीय घट झाल्याचेही त्यांनी सांगितले.

क्षयरोग निर्मूलनासाठी केलेल्या कामगिरीचे श्रेय राज्यमंत्र्यांना देत केंद्रीय मंत्र्यांनी या मोहिमेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले. त्यांनी सक्रिय टीबी चाचणी, तपासणी आणि रुग्णांच्या निदानासाठी चाचणी, ट्रॅक आणि निदानाचे महत्त्व अधोरेखित केले, आणि सर्वांना त्यांच्या चिन्हीत केलेल्या जिल्ह्यांमध्ये मोहिमेचे सक्रियपणे निरीक्षण करण्याचे आवाहन केले. क्षयरोग मोहिमेला राज्यमंत्री देऊ शकतील असे समर्थन अधोरेखित करून, त्यांनी त्यांच्या सभा आणि रॅलींमध्ये या मोहिमेचा प्रचार करण्याची विनंती केली आणि क्षयरोग रुग्णांना दत्तक घेण्यासाठी नी-क्षय मित्र म्हणून पुढे येण्याचे आवाहन केले.

देशभरातील 347 प्राधान्य असलेल्या जिल्ह्यांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण आणि क्षयरोगामुळे होणारे मृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने 100 दिवसांच्या मोहिमेचा आढावा या कार्यक्रमात सादर करण्यात आला.

या मोहिमेदरम्यान हाती घेण्यात येणाऱ्या विविध सामुदायिक एकत्रीकरण उपक्रमांबाबतही राज्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली, ज्यात प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी 80,000 पेक्षा जास्त नि-क्षय शिबिरांचा समावेश आहे. लोक सहभागाच्या दृष्टिकोनावर आधारित या मोहिमेचा उद्देश समुदाय सदस्यांना नी-क्षय शपथ घेण्यासाठी एकत्रित करणे, समुदायाचे नेते, व्यक्ती, एनजीओ आणि कॉर्पोरेट्सना नि-क्षय मित्र बनण्यासाठी उद्युक्त करणे हा आहे. सोबतच, टीबी विजेता (टीबी चॅम्पियन) आणि नि-क्षय मित्रांना त्यांच्या योगदानासाठी पुरस्कृत केले जाईल, जेणेकरून सामूहिक कृतीला आणखी प्रेरणा देता येणार आहे. पंचायती राज संस्थेच्या सदस्यांचा सहभाग महत्त्वाचा असेल आणि आवश्यक सेवांचा वापर सुनिश्चित करताना समुदाय जागरूकता वाढवण्यासाठी क्षयरोगाबाबत नियमित ग्रामसभा आयोजित केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

About Matribhumi Samachar

Check Also

आयएनएसव्ही कौंडिण्यने आपल्या पहिल्या सागरी प्रवासाला केली सुरुवात

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2025. भारतीय नौदलाच्या  स्वदेशी बनावटीच्या, पारंपरिक शिवणकाम केलेल्या जहाजाने ‘आयएनएसव्ही कौंडिण्य’ ने …