Friday, January 02 2026 | 03:07:34 AM
Breaking News

शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता नव्हे तर ऊर्जादाता इंधन दाता देखील व्हायला पाहिजे – केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

Connect us on:

शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता नव्हे तर ऊर्जादाता  इंधन दाता देखील व्हायला पाहिजे असे  आवाहन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी गडकरी यांनी आज केले.भारतातील पहिल्या बायो बिट्टूमेन या साम्रगीवर आधारित राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन आज  नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरातील मनसर राष्ट्रीय महामार्ग  येथे झाले त्यावेळी ते बोलत होते.  याप्रसंगी  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सहसचिव कमलेश चोधरी,  केंद्रीय रस्ते संशोधन संस्था – सीआरआरआयचे संचालक   प्रो. मनोरंजन परिड़ा , राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य महाव्यवस्थापक आर.पी. सिंह उपस्थित होते.

पिकांच्या अवशेषांपासून – लिग्निन पासून  बनवलेल्या  बिट्टूमेनचा वापर करून बांधलेला  हा  देशातील पहिला राष्ट्रीय महामार्ग आहे. बायो बिटुमेनपासून तयार झालेला हा रस्ता,  पारंपारिक, डांबरापासून तयार झालेल्या रस्त्यापेक्षा, ४० टक्के सुरक्षित असून, डांबरात १५ टक्के बायो बिटूमेन मिसळून, नागपूर-मनसर, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पात, 1 किलोमीटर लांबीची रस्ता निर्मिती करण्यात आल्याची माहिती  गडकरींनी यावेळी दिली. बांबूपासून बायो सी.एन.जी. त्याचप्रमाणे, लिग्निनची निर्मिती करून, यापासून नवे उद्योग सुरू करता येतील. या पर्यावरणपूरक रस्ते निर्मितीपासून, रस्ते निर्मितीच्या खर्चात कपात होईल, रोजगार निर्मिती होईल तसंच शेतमालाच्या ज्वलनापासून होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसेल असे  त्यांनी सांगितले.

भारत कृषीप्रधान देश असल्यामुळे पिकांसोबतच त्यांचे अवशेष देखील मोठ्या प्रमाणात शिल्लक राहतात. ते जाळल्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतं. त्याचप्रमाणे  देशात सुमारे 25 हजार कोटी रुपयाचे  बिटूमेन आयात  होते.या पारंपारिक बिटूमन वरील अवलंबत्व  कमी करण्यासाठी बायोबिटूमीनचे पारंपारिक बिटूमेन मध्ये मिश्रण करणे फायद्याचे ठरते. यामुळे रस्ते बांधणीत सुद्धा खर्च कमी येतो   असे त्यांनी  यावेळी नमुद केले. रामटेक, भंडारा सारख्या तांदुळ उत्पादक पट्ट्यात भात शेतीनंतर उरणाऱ्या राईस स्ट्रा, हस्क पासून सीएनजी आणि बिटुमन बनविण्याची क्षमता आहे . बांबू पासून बायो सीएनजी त्याचप्रमाणे लिग्निनची निर्मिती करून या तंत्रज्ञावर आधारित नवे उद्योग सुरू करता येतील. भंडारा-गोंदिया यासारख्या धान उत्पादक जिल्ह्यांना यामुळे नवी दिशा मिळेल, गडकरींनी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राज इंडस्ट्रीज चे प्रमुख अतुल मुळे यांनी केले त्याचप्रमाणे प्राज इंडस्ट्रीजचे मुख्य वैज्ञानिक सिद्धार्थ पाल आणि अंबिका बहेल यांनी या संशोधनाविषयी सविस्तर माहिती दिली .या कार्यक्रमाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्राज बायोटेक इंडस्ट्रीजचे पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

About Matribhumi Samachar

Check Also

आयएनएसव्ही कौंडिण्यने आपल्या पहिल्या सागरी प्रवासाला केली सुरुवात

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2025. भारतीय नौदलाच्या  स्वदेशी बनावटीच्या, पारंपरिक शिवणकाम केलेल्या जहाजाने ‘आयएनएसव्ही कौंडिण्य’ ने …