नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (टीआरएआय)ने जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत आपली पोहोच व्यापक करण्यासाठी सुधारित संकेतस्थळ सुरू केले आहे. सोशल मीडियाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन, नवीन शेअरिंग फिचर्सद्वारे नियामक माहिती सर्व भागधारकांपर्यंत पोहोचवणे सुलभ झाले आहे.हे संकेतस्थळ दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रातील नियम, धोरणे, कायदे, आकडेवारी आणि कल याबाबतची सविस्तर माहिती देते. ही माहिती जनसामान्य, भागधारक, संशोधक आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी सहज उपलब्ध आहे.

नवीन संकेतस्थळामध्ये समाविष्ट केलेली अतिरिक्त वैशिष्ट्ये:
- दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रासाठी नवीन डॅशबोर्डची सुरवात .
- संशोधनासाठी डेटा डाउनलोड करण्याची सोय.
- नवीन आणि आकर्षक स्वरूपात डेटा पाहण्यासाठी ग्रिड व्यू फिचर.
- ईमेलद्वारे माहिती शेअर करण्याव्यतिरिक्त, आता महत्त्वाच्या समाज माध्यमांवर(इंस्टाग्राम, युट्युब, लिंक्ड इन, व्हाट्सअप, फेसबुक, एक्स) कागदपत्रे थेट शेअर करता येतील.
- ट्रायची नवी पत्रके आणि अपडेट्ससाठी ऑनलाइन सदस्यता नोंदणी.
- प्राधिकरणाचे संक्षिप्त प्रोफाइल.
- आयसोएस, ॲन्ड्रॉईड आणि विविध प्लॅटफॉर्म्सशी सुसंगतता.
- नोंदणीकृत वापरकर्त्यांसाठी ब्लॉग आणि टिप्पणी देण्याची सुविधा.
- आगामी कार्यक्रमांची माहिती प्रकाशित करण्याची सोय.
- ओपन हाऊस चर्चांमध्ये सहभागासाठी ऑनलाइन नोंदणी.
- पोहोच संदर्भातल्या सुविधेचे अनुपालन
- निविदा आणि सूचना.
- नियमांचे संक्षिप्त आणि संकलित स्वरूप, ज्यामध्ये सुधारणांचा उल्लेख पायतळ टिप्पण्यांमध्ये आहे
नवीन संकेतस्थळाचे होस्टिंग एनआयसी क्लाउडवर केले जाईल. नवीन संकेतस्थळ चालू झाल्यानंतर जुने संकेतस्थळ 3 महिने चालू राहील. ‘टीएआरए’ (टेलिकॉम अथॉरिटी रिस्पॉन्सिव्ह ॲडव्हायझर) नावाचा चॅटबॉट परिचयात आणला गेला आहे, जो परस्परसंवादी शोध सुविधा उपलब्ध करून देतो.

या नवीन वैशिष्ट्यांचा उद्देश दूरसंचार आणि प्रसारण क्षेत्रातील ट्रायच्या नियामक उपक्रमांमध्ये पारदर्शकता, प्रवेशयोग्यता आणि सार्वजनिक सहभाग वाढवणे आहे.
Matribhumi Samachar Marathi

