Saturday, January 03 2026 | 10:09:22 PM
Breaking News

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘सदैव अटल’ या स्मृतीस्थळावर केले अभिवादन

Connect us on:

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2024

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘सदैव अटल’ या त्यांच्या स्मृतीस्थळावर भेट देऊन त्यांचे अभिवादन केले.

   

एक्सवरील त्यांच्या पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले की, अटलजींचे सुशासन आणि जनकल्याणासाठीचे समर्पण पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. अटल बिहारी वाजपेयीजींच्या जयंतीनिमित्त नतमस्तक होताना, शाह म्हणाले की, अटलजींनी आपल्या विचारधारेशी व मूल्याधारित राजकारणाशी समर्पित राहून देशात विकास आणि सुशासनाचा नवा अध्याय सुरू केला. त्यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाला कार्यसंस्कृती बनवले आणि नेहमीच देशाची सुरक्षा व जनकल्याण यांना प्राधान्य दिले. ते असेही म्हणाले की, अटलजींनी देशसेवेच्या मार्गावर देशवासीयांना सदैव मार्गदर्शन केले आणि ते सर्वांसाठीच कायमस्वरूपी एका ध्रुवताऱ्यासारखे प्रेरणास्थान बनून राहतील.

About Matribhumi Samachar

Check Also

आयुष मंत्रालयाच्या वतीने नवव्या सिद्ध दिन सोहळ्यानिमित्त उद्या चेन्नई इथं कार्यक्रमाचे आयोजन, सहा जानेवारीला राष्ट्रीय सिद्ध दिन साजरा केला जाणार

केंद्रीय आयुष मंत्रालय, राष्ट्रीय सिद्ध संस्था आणि सिद्ध संशोधनासाठी केंद्रीय परिषद या आपल्या संलग्न संस्थांच्या सहकार्याने, तसेच …