Tuesday, December 09 2025 | 12:49:48 AM
Breaking News

स्वामित्व योजनेंतर्गत 50 लाखांहून अधिक मालमत्ताधारकांना पंतप्रधान मालमत्ता पत्रे करणार वितरित

Connect us on:

नवी दिल्‍ली, 26 डिसेंबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 डिसेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता दृकश्राव्य माध्यमाद्वारे 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 200 जिल्ह्यांमधील 46,000 हून अधिक गावांमधील मालमत्ताधारकांना स्वामित्व (SVAMITVA) योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक मालमत्ता पत्रांचे वितरण करणार आहेत.

ग्रामीण भारताचा आर्थिक विकास साध्य करण्याच्या दृष्टीकोनातून आधुनिक ड्रोन सर्वेक्षण तंत्रज्ञानाद्वारे खेड्यांमध्ये घरे असलेल्या कुटुंबांना ‘मालकीहक्क नोंदी’ करुन देण्यासाठी स्वामित्व (SVAMITVA) योजना सुरू करण्यात आली आहे.

ही योजना मालमत्तेचे मुद्रीकरण सुलभ करत, बँकेसारख्या पतसंस्थांकडून  कर्ज घेण्यासाठी,  मालमत्तेशी संबंधित विवाद कमी करण्यासाठी  ग्रामीण भागात मालमत्ता आणि मालमत्ता कराचे अधिक चांगले मूल्यांकन करण्यासाठी आणि सर्वसमावेशक ग्राम-स्तरीय नियोजन सक्षम करण्यासाठी, उपयुक्त आहे

3.1 लाखाहून अधिक गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, ज्यामध्ये निश्चित केलेल्या गावांपैकी 92% गावांचा समावेश आहे.  आतापर्यंत जवळपास 1.5 लाख गावांसाठी सुमारे 2.2 कोटी मालमत्ता पत्र तयार करण्यात आली आहेत.

त्रिपुरा, गोवा, उत्तराखंड आणि हरियाणामध्ये ही योजना सर्व पात्र   लाभार्थ्यापर्यंत पोहोचली आहे.  मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये तसेच अनेक केंद्रशासित प्रदेशांमध्ये ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

 

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

 

About Matribhumi Samachar

Check Also

वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित विशेष चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2025. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित …