मल्याळम चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील सर्वात आदरणीय व्यक्तींपैकी एक, एम. टी. वासुदेवन नायर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. एम. टी. वासुदेवन नायर यांच्या कार्याने मानवी भावनांचा सखोल शोध घेऊन अनेक पिढ्यांना आकार दिला आहे आणि त्यांचे कार्य यापुढेही अनेकांना प्रेरणा देत राहतील, अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे :
“मल्याळम चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील सर्वात आदरणीय व्यक्तींपैकी एक, श्री एम. टी. वासुदेवन नायर जी यांच्या निधनाने अतिव दु:ख झाले. मानवी भावनांचा सखोल शोध घेणाऱ्या त्यांच्या कार्याने अनेक पिढ्या घडवल्या आहेत आणि त्यांचे कार्य या पुढेही अनेकांना प्रेरणा देत राहतील. मूक आणि उपेक्षितांनाही त्यांनी आवाज दिला. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती माझ्या संवेदना आहेत. ओम शांती.”
Matribhumi Samachar Marathi

