Monday, January 05 2026 | 01:35:47 PM
Breaking News

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 2024 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार केले जाहीर

Connect us on:

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2025

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आज 2024चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर केले. राष्ट्रपती 17 जानेवारी 2025(शुक्रवार) रोजी सकाळी 11 वाजता या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात करणार आहेत.

समितीच्या शिफारशींवर आधारित आणि आवश्यक ती छाननी  केल्यानंतर, सरकारने खालील खेळाडू, प्रशिक्षक, विद्यापीठ आणि संस्थांना पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

i.  मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024

क्र. खेळाडूचे नाव क्रीडा प्रकार
1. गुकेश डी बुद्धिबळ
2. हरमनप्रीत सिंग हॉकी
3.  प्रवीण कुमार पॅरा-ॲथलेटिक्स
4. मनु भाकर नेमबाजी

ii. क्रीडा आणि खेळ 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्का

क्र. खेळाडूचे नाव क्रीडा प्रकार
1 ज्योती येराजी ॲथलेटिक्स
2 अन्नू राणी ॲथलेटिक्स
3 नितू मुष्टियुद्ध
4 स्वीटी मुष्टियुद्ध
5  वंतिका अग्रवाल बुद्धिबळ
6 सलीमा टेटे हॉकी
7  अभिषेक हॉकी
8  संजय हॉकी
9 जरमनप्रीत सिंग हॉकी
10 सुखजीत सिंग हॉकी
11 राकेश कुमार पॅरा-तिरंदाजी
12  प्रीती पाल पॅरा-ॲथलेटिक्स
13 जीवनजी दीप्ती पॅरा-ॲथलेटिक्स
14 अजित सिंग पॅरा-ॲथलेटिक्स
15 सचिन सर्जेराव खिलारी पॅरा-ॲथलेटिक्स
16 धरमबीर पॅरा-ॲथलेटिक्स
17 प्रणव सूरमा पॅरा-ॲथलेटिक्स
18 एच होकातो सेमा पॅरा-ॲथलेटिक्स
19  सिमरन पॅरा-ॲथलेटिक्स
20  नवदीप पॅरा-ॲथलेटिक्स
21 नितेश कुमार पॅरा-बॅडमिंटन
22 तुलसीमाथी मुरुगेसन पॅरा-बॅडमिंटन
23 नित्या     सुमथी सिवन पॅरा-बॅडमिंटन
24 मनिषा रामदास पॅरा-बॅडमिंटन
25 कपिल परमार पॅरा-जुडो
26 मोना अग्रवाल पॅरा-नेमबाजी
27 रुबिना फ्रान्सिस पॅरा- नेमबाजी
28 स्वप्नील सुरेश कुसळे नेमबाजी
29  सरबज्योत सिंग नेमबाजी
30 अभय सिंह स्क्वॅश
31  साजन प्रकाश पोहणे
32  अमन कुस्ती

iii. क्रीडा आणि खेळ 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव)

 क्र. खेळाडूचे नाव शिस्त
1  सुचा सिंग ॲथलेटिक्स
2  मुरलीकांत राजाराम पेटकर पॅरा-पोहणे

iv. क्रीडा आणि खेळ 2024 मध्ये उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार

A.    नियमित श्रेणी:

 क्र. प्रशिक्षकाचे नाव शिस्त
1  सुभाष राणा पॅरा-नेमबाजी
2 दीपाली देशपांडे नेमबाजी
3 संदीप सांगवान हॉकी

B.    जीवनगौरव  श्रेणी:

 क्र. प्रशिक्षकाचे नाव शिस्त
1 एस मुरलीधरन बॅडमिंटन
2 अरमांडो अग्नेलो कोलाको फुटबॉल

v. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार

क्र. संस्थेचे  नाव
1 फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया

vi. मौलाना अबुल कलाम आझाद (एमएकेएट्रॉफी 2024:

 क्र. विद्यापीठाचे नाव
1 चंदीगड विद्यापीठ सर्वसाधारण  विजेते विद्यापीठ
2 लवली व्यावसायिक विद्यापीठ, (पीबी) प्रथम क्रमांकाचे उपविजेते विद्यापीठ
3 गुरु नानक देव विद्यापीठ, अमृतसर द्वितीय उपविजेते विद्यापीठ

‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार’ दरवर्षी क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दिले जातात.

मागील  चार वर्षांमध्ये क्रीडा क्षेत्रात सर्वोत्तम, नेत्रदीपक कामगिरी केलेल्या खेळाडूला ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’  दिला जातो.

‘अर्जुन पुरस्कार’ चार वर्ष सातत्याने खेळामध्ये प्रावीण्यासह नेतृत्वगुण, खिलाडूवृत्ती व शिस्तीचे प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूला दिला जातो.

आपल्या कारकिर्दीत क्रीडा क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि आपल्या क्रीडा प्रकारातून निवृत्ती घेतल्यानंतरही खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी काम करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी त्यांना ‘अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव)’ प्रदान करण्यात येतो.

क्रीडा प्रशिक्षकांना दिला जाणारा ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ अशा प्रशिक्षकांना दिला जातो; जे आपल्या शिष्यांना सातत्याने सर्वोत्तम कामगिरी आणि   आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून सराव करुन घेतात.

खेलो इंडिया विद्यापीठ स्तरीय  क्रीडास्पर्धांमध्ये अग्रक्रमांकावर असलेल्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) करंडक प्रदान करण्यात येईल.

या पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले जातात आणि खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडासंस्था यांना पुरस्कारांसाठी समर्पित ऑनलाइन  पोर्टलद्वारे अर्ज करण्याची परवानगी दिली जाते. या वर्षी या पुरस्कारांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले. या अर्जांवर निवड समितीच्या सदस्यांनी विचारविनिमय केला. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमणियम यांच्या नेतृत्वातील या निवड समितीमध्ये प्रसिद्ध खेळाडू, क्रीडा पत्रकारितेतील अनुभवी व्यक्ती आणि क्रीडा क्षेत्रातील प्रशासक यांचा समावेश आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाराणसी येथे 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे केले उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे …