पुणे, 2 जुलै 2025. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था अर्थात ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टीट्युट ऑफ इंडिया’ (FTII) ला भेट दिली.
या भेटीत त्यांनी संस्थेतील सर्व विभागांमध्ये जाऊन संस्थेमध्ये चालणाऱ्या कामकाजाची तसेच प्रशिक्षणाची माहिती घेतली; तसेच उपस्थित विद्यार्थ्यांसोबत व शिक्षक वर्गासोबत देखील त्यांनी संवाद साधला.
या पहिल्या सत्रातील भेटीनंतर त्यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (NFAI) पुण्याच्या कोथरूड भागातील परिसराला देखील भेट दिली.
यावेळी राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेचे संचालक धीरज सिंग, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम, केंद्रीय संचार ब्युरो, पुणेचे उपसंचालक व प्रमुख निखील देशमुख, राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेचे निबंधक प्रतिक जैन तसेच आकाशवाणी वृत्त विभागाचे प्रमुख, सहायक संचालक माधव जायभाये उपस्थित होते.
YSBF.jpeg)



Matribhumi Samachar Marathi

