Tuesday, December 09 2025 | 05:20:17 AM
Breaking News

महाराष्ट्रात 89,780 कोटी रुपये खर्चाचे 38 रेल्वे प्रकल्प नियोजन आणि अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर

Connect us on:

मुंबई, 1 ऑगस्ट 2025. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांची प्रगती वेगाने सुरु असून कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी राज्य सरकार पूर्ण पाठिंबा देत आहे. तत्कालीन राज्य सरकारच्या धोरणांमुळे 2019 ते  2022  दरम्यान अनेक रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे काम रखडले होते. याचा रेल्वे आणि मेट्रो प्रकल्पांवर, विशेषतः अतिजलद कॉरिडॉरवर मोठा परिणाम झाला. मात्र 2022 पासून, महाराष्ट्रात कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी चांगला पाठिंबा मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या चार रेल्वे विभागांच्या अखत्यारीत येते. या विभागांसाठी 2025–26 आर्थिक वर्षासाठी  3,751 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी आतापर्यंत 813 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प

मुंबई उपनगरीय क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि प्रवाशांच्या भविष्यातील मागण्या पूर्ण करण्यासाठी, 8,087 कोटी रुपये खर्चाचा मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी )-II, 10,947 कोटी रुपये खर्चाचा एमयूटीपी -III आणि 33,690 कोटी रुपये खर्चाचा एमयूटीपी -IIIA मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पांमध्ये मुंबई उपनगरीय क्षेत्रातील खालील कामांचा समावेश आहे :

अनु . क्र. प्रकल्पाचे नाव खर्च (कोटीरुपये )
1 मुंबई सेंट्रल-बोरिवली सहावी मार्गिका (30 किमी) 919
2 गोरेगाव-बोरिवली  हार्बर मार्गाचा विस्तार (7 किमी) 826
3 विरार-डहाणू रोड तिसरी व चौथी मार्गिका (64 किमी) 3587
4 सीएसटीएम-कुर्ला  पाचवी व सहावी मार्गिका (17.5 किमी) 891
5 पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉर (29.6 किमी) 2782
6 ऐरोली-कळवा (उन्नत) उपनगरीय कॉरिडॉर लिंक (3.3 किमी) 476
7 बोरिवली-विरार पाचवी व सहावी मार्गिका (26 किमी) 2184
8 कल्याण-आसनगाव दरम्यान चौथी मार्गिका (32 किमी) 1759
9 कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरी व चौथी मार्गिका (14.05 किमी) 1510
10 कल्याण यार्ड-मेन लाइन व उपनगरीय मार्गीकेचे विलगीकरण 866
11 नायगाव ते जुचंद्र दरम्यान (दुहेरी मार्ग) वसई बायपास लाइन (5.73   किमी) 176
12 अतिक्रमण नियंत्रण (34 ठिकाणे ) 551

याशिवाय, 1 एप्रिल 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्यात 89,780 कोटी रुपयांचे एकूण 5,098 किमी लांबीचे 38 रेल्वे प्रकल्प पूर्णपणे/अंशतः नियोजन आणि अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर आहेत, त्यापैकी 2,360 किमी लांबीचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत आणि मार्च 2025 पर्यंत 39,407 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

कामाची सद्यःस्थिती पुढील प्रमाणे:

श्रेणी प्रकल्पांची संख्या एकूण लांबी (कि.मी.) कार्यान्वित मार्गिका  (कि.मी.) मार्च 2025 पर्यंतचा खर्च  (कोटी रु.)
नवीन मार्गिका 11 1,355 234 10,504
गेज रूपांतरण  2   609 334   4,286
दुहेरीकरण/ मल्टीट्रॅकिंग          25       3,134          1,792 24,617
एकूण          38       5,098          2,360             39,407

2009-14 आणि 2014-25 दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या पूर्णतः/अंशतः अखत्यारीत येणारे कार्यान्वित (नवीन मार्गगेज रूपांतरण आणि दुहेरीकरणकरण्यात आलेले विभाग

कालखंड नवीन मार्गिका कार्यान्वित नवीन मार्गिका कार्यान्वित होण्याची सरासरी आकडेवारी  
2009-14 292 की.मी. 58.4 कि.मी. / वर्ष
2014-25 2,292 कि.मी. (8 वेळा) 208.36 किमी / वर्ष (3.5 पट पेक्षा जास्त)

महाराष्ट्रात पूर्णतः/अंशतः येणारे पायाभूत सुविधा प्रकल्प आणि इतर कामांसाठी सरासरी अर्थसंकल्पीय तरतूद पुढील प्रमाणे:

कालखंड खर्च
2009-14 ₹ 1,171 कोटी/वर्ष
2025-26 ₹ 23,778 कोटी (20 पटीहून अधिक)

महाराष्ट्रात पूर्णतः/अंशतः येणाऱ्या नुकत्याच पूर्ण झालेल्या काही प्रकल्पांचे तपशील पुढील प्रमाणे:

अनु क्र. प्रकल्प खर्च (₹ कोटी)
1 जबलपूरगोंदिया गेज रूपांतरण (300 किमी) 2005
2 छिंदवाडानागपूर गेज रूपांतरण (150 किमी) 1512
3 पनवेलपेण दुहेरीकरण (35 किमी) 263
4 पनवेलरोहा दुहेरीकरण (75 किमी) 31
5 पेण-रोहा दुहेरीकरण (40 किमी) 330
6 उधनाजळगाव दुहेरीकरण (307 किमी) 2448
7 मुदखेडपरभणी दुहेरीकरण (81 किमी) 673
8 भुसावळ – जळगाव तिसरी मार्गिका (24 किमी) 325
9 जळगाव-भुसावळ चौथी मार्गिका (24 किमी) 261
10 दौंडगुलबर्गा दुहेरीकरण (225 किमी) 3182

महाराष्ट्रात पूर्णतः/अंशतः येणारे हाती घेतलेले काही मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प पुढील प्रमाणे:

अनु क्र. प्रकल्पाचे नाव खर्च (₹ कोटी)
1 अहमदनगरबीडपरळी वैजनाथ नवीन मार्गिका (261 किमी.) 4,957
2 बारामतीलोणंद नवीन मार्गिका (64 किमी.) 1,844
3 वर्धानांदेड नवीन मार्गिका (284 किमी.) 3,445
4 धुळे (बोरविहीर)-नरडाणा नवीन मार्गिका (51  किमी.) 1,171
5 मनमाड-इंदूर नवीन मार्गिका (309 किमी.) 16,321
6 वडसागडचिरोली नवीन मार्गिका (52 किमी.) 1,886
7 जालना-जळगाव नवीन मार्गिका (174 किमी.) 5,804
8 पुणे-मिरज-लोंडा दुहेरीकरण (466 किमी.) 6,463
9 दौंड मनमाड दुहेरीकरण (236 किमी.) 30,376
10 मुदखेड – मेडचाळ आणि महबूबनगर – ढोणे विभाग दुहेरीकरण (417 किमी.) 4,686
11 होटगीकुडगीगदग दुहेरीकरण (284 किमी.) 2,459
12  कल्याणकसारा – तिसरी मार्गिका (68 किमी.) 1,433
13 वर्धानागपूर तिसरी मार्गिका (76 किमी.) 698
14 वर्धाबल्लारशाह तिसरी मार्गिका (132 किमी.) 1,385
15 इटारसीनागपूर तिसरी मार्गिका (280 किमी.) 2,450
16 मनमाड जळगाव तिसरी मार्गिका (160 किमी.) 1,677
17 काझीपेटबल्लारशाह – तिसरी मार्गिका (202 किमी.) 3,183
18 राजनांदगाव-नागपूर तिसरी मार्गिका (228 किमी.) 3,545
19 वर्धानागपूर चौथी मार्गिका (79 किमी.) 1,137
20 जळगाव-मनमाड चौथी मार्गिका (160 किमी.

याव्यतिरिक्त, मागील तीन आर्थिक वर्षांत, म्हणजेच 2022-23, 2023-24 आणि 2024-25 तसेच चालू आर्थिक वर्षात, महाराष्ट्रातील पूर्णतः /अंशतः एकूण 7979 किमी लांबीच्या 94 सर्वेक्षणांना (26 नवीन मार्ग, 2 गेज परिवर्तन आणि 66 दुहेरीकरण) प्रधानमंत्री गतीशक्ती राष्ट्रीय बृहत् आराखड्याअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे.

मागील तीन आर्थिक वर्षांत, म्हणजेच 2022-23, 2023-24 आणि 2024-25 तसेच चालू आर्थिक वर्षात, महाराष्ट्रातील पूर्णतः /अंशतः एकूण 7979 किमी लांबीच्या 94 सर्वेक्षणांना (26 नवीन मार्ग, 2 गेज परिवर्तन आणि 66 दुहेरीकरण) प्रधानमंत्री गतीशक्ती राष्ट्रीय बृहत् आराखड्याअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. काही महत्त्वाची सर्वेक्षणे खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत :

यामध्ये मराठवाडा विभागातील प्रकल्पांचाही समावेश आहे. काही महत्त्वाची सर्वेक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

अ.क्र. प्रकल्पाचे नाव लांबी (किलोमीटरमध्ये)
1 उस्मानाबाद-बीड-छत्रपती संभाजीनगर नवीन मार्ग 240
2 छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव नवीन मार्ग 93
3 बोधन-लातूर नवीन मार्ग 135
4 कलबुर्गी-लातूर नवीन मार्ग 139
5 लातूर-नांदेड नवीन मार्ग 104
6 जालना-खामगाव नवीन मार्ग 155
7 छत्रपती संभाजीनगर-परभणी दुहेरीकरण 177

महाराष्ट्रातील स्थानकांचा विकास

अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत एकूण 1337 स्थानकांपैकी महाराष्ट्रातील 132 स्थानके विकासासाठी निश्चित करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. आतापर्यंत, या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 15 अमृत भारत स्थानकांच्या (आमगाव, चांदा फोर्ट, चिंचपोकळी, देवळाली, धुळे, केडगाव, लासलगाव, लोणंद जंक्शन, माटुंगा, मूर्तिजापूर जंक्शन, नेताजी सुभाष चंद्र बोस इटवारी जंक्शन, परळ, सावदा, शहाड, वडाळा रोड) पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत. अमृत भारत स्थानक योजनेसह सर्व स्थानकांचा विकास, अद्ययावतीकरण आणि आधुनिकीकरण हे साधारणपणे ‘प्लॅन हेड-53 – कस्टमर ॲमेनिटीज’ अंतर्गत निधीतून केले जाते. या प्लॅन हेड-53 अंतर्गत निधीचे वाटप आणि खर्चाचा तपशील विभागवार ठेवला जातो, तो कामनिहाय, स्थानकनिहाय किंवा राज्यनिहाय ठेवला जात नाही.

अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत महाराष्ट्रात विकासासाठी निश्चित करण्यात आलेल्या स्थानकांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

अहमदनगर,अजनी (नागपूर), अक्कलकोट रोड, अकोला, आकुर्डी, अमलनेर, आमगाव, अमरावती, अंधेरी, बडनेरा, बल्लारशाह, बांद्रा टर्मिनस, बारामती, बेलापूर, भंडारा रोड, भोकर, भुसावळ, बोरिवली, बायकुला,चाळीसगाव, चांदा फोर्ट, चंद्रपूर, चर्नी रोड, छत्रपती संभाजी नगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चिंचपोकळी, चिंचवड, दादर (मध्य रेल्वे), दादर (पश्चिम रेल्वे), दहिसर, दौंड, देहू रोड, देवळाली, धामणगाव, धारंगगाव, धाराशिव, धर्माबाद, धुळे, दिवा, दुधनी, गंगाखेड, गोधनी, गोंदिया, ग्रँट रोड, हडपसर, हातकणंगले, हजर साहिब नांदेड, हिमायतनगर, हिंगणघाट, हिंगोली डेक्कन, इगतपुरी, जळगाव, जालना, जेऊर, जोगेश्वरी, कल्याण जंक्शन, कामठी, कांदिवली, कांजूर मार्ग, कराड, काटोल, केडगाव, किनवट, कोपरगाव, कुर्डुवाडी जंक्शन, कुर्ला जंक्शन, लासलगाव, लातूर, लोकमान्य टिळक टर्मिनस, लोणंद जंक्शन, लोणावळा, लोअर परळ, मालाड, मलकापूर, मनमाड जंक्शन, मानवत रोड, मरीन लाईन्स, माटुंगा, मिरज जंक्शन, मुदखेड जंक्शन, मुंबई सेंट्रल, मुंब्रा, मूर्तिजापूर जंक्शन, नागरसोल, नागपूर जंक्शन, नांदगाव, नांदुरा, नंदुरबार, नरखेड जंक्शन, नाशिक रोड, नेताजी सुभाष चंद्र बोस इटवारी जंक्शन, पाचोरा जंक्शन, पालघर, पंढरपूर, पनवेल जंक्शन, परभणी जंक्शन, परळ, परळी वैजनाथ, परतूर, फलटण, प्रभादेवी, पुलगाव जंक्शन, पुणे जंक्शन, पूर्णा जंक्शन, रावेर, रोटेगाव, साईनगर शिर्डी, सँडहर्स्ट रोड, सांगली, सातारा, सावदा, सेलू, सेवाग्राम, शहाड, शेगाव, शिवाजी नगर पुणे, श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर, सोलापूर, ताळेगाव, ठाकुरली, ठाणे, टिटवाळा, तुमसर रोड, उमरी, उरळी, वडाळा रोड, विद्याविहार, विक्रोळी, वडसा, वर्धा, वाशिम, वठार

केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत संजय राऊत यांनी विचारलेल्या एका अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

About Matribhumi Samachar

Check Also

नागपुरात जागतिक मृदा दिनी सेंद्रीय शेती संदर्भात प्रादेशिक सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती केंद्र तसेच एनडीआरएफ अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

नागपूर 5 डिसेंबर 2025 मृदेचे आरोग्य आपण जर व्यवस्थित राखले , रसायनाचा उपयोग न करता  कचऱ्यापासून …