नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2025. लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह यांनी दि. 31 जुलै 2025 रोजी लष्कराच्या उपप्रमुख पदाची पदभार स्वीकारला. यापूर्वी ते लष्कराच्या मुख्यालयात ‘ऑपरेशनल लॉजिस्टिक्स अँड स्ट्रॅटेजिक मूव्हमेंट’ विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत होते.
लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह हे डिसेंबर 1987 मध्ये दि पॅराशूट रेजिमेंटच्या (विशेष दल) चौथ्या बटालियनमध्ये नियुक्त झाले आणि लष्कराच्या सेवेत रुजू झाले होते. ते लखनऊ विद्यापीठाअंतर्गतच्या लखनऊमधील ला मार्टिनिअर महाविद्यालय आणि डेहराडून इथल्या प्रतिष्ठित भारतीय लष्कर अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत.
आपल्या 38 वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीत, लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह यांनी विविध कमांड आणि स्टाफ पदांवर काम केले आहे.
देशासाठी दिलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना अति विशिष्ट सेवा पदक तसेच ‘बार टू सेना पदक’ देवून सन्मानित केले गेले आहे.

8QJB.jpeg)
F6AJ.jpeg)

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

