Saturday, December 13 2025 | 01:50:51 PM
Breaking News

भारत निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ

Connect us on:

शुद्ध व बिनचूक मतदार याद्या हा लोकशाहीचा पाया आहे. मतदार यादी तयार करणाऱ्या यंत्रणेत, मतदार नोंदणी अधिकारी (EROs), सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AEROs), मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक (BLO Supervisors) आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLOs) यांचा समावेश असतो. हे सर्वजण नि:पक्षपाती व पारदर्शक मतदार याद्या तयार करण्यासाठी कठोर परिश्रम घेतात तसेच या संपूर्ण प्रक्रेयेत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळेच, भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी तयार करणे व त्यात सुधारणा करण्याच्या कामाशी जोडलेल्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांचे वार्षिक मानधन दुप्पट करण्याचा तसेच मतदान केंद्र पर्यवेक्षकांच्या मानधनातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

याआधी 2015 मध्ये अशा प्रकारची वाढ केली गेली होती. तसेच, मतदार नोंदणी अधिकारी (EROs) व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना (AEROs) पहिल्यांदाच मानधन देण्यात येणार आहे.

अ.क्र.     पद 2015 पासूनचे मानधन सुधारित मानधन
1 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) Rs. 6000 Rs 12000
2 मतदार यादीच्या पुनरीक्षणासाठी BLO यांना प्रोत्साहन भत्ता Rs 1000 Rs 2000
3 मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक Rs 12000 Rs 18000
4 सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) काहीही नाही Rs 25000
5 मतदार नोंदणी अधिकारी (ERO) काहीही नाही Rs 30000

याव्यतिरिक्त, आयोगाने बिहारपासून सुरू झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कामासाठीही मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकरता 6,000 रुपयांची विशेष प्रोत्साहनपर रक्कमेलाही मंजूरी दिली आहे.

आयोगाच्या या निर्णयातून मतदार याद्या बिनचूक असाव्यात यासह, मतदारांना मदत करण्यासाठी व निवडणूक प्रक्रिया बळकट करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर अथकपणे काम करत असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांना योग्य मोबदला देण्याप्रती आयोगाच्या वचनबद्धताही प्रतिबिंबित झाली आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

भारताच्या जनगणना 2027 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्‍ये भारताच्या जनगणना 2027 ला मंजुरी देण्‍यात आली. या …