Monday, December 08 2025 | 03:12:39 AM
Breaking News

पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल दिनाच्या वार्षिक पत्रकार परिषदेत माध्यमांशी साधला संवाद

Connect us on:

मुंबई , 2 डिसेंबर 2025

व्हाइस ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन, एव्हीएसएम एनएम, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ वेस्टर्न नेव्हल कमांड (एफओसी-इन-सी वेस्ट), यांनी 02 डिसेंबर 2025 रोजी मुंबईतील वेस्टर्न नेव्हल कमांड ऑफिसर्स मेस मधील नव्याने उद्घाटन झालेली बहुमजली  इमारत ‘सुमेरू’ येथे नौदल दिनाच्या वार्षिक पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला.

1971 च्या भारत-पाक युद्धात भारतीय नौदलाने कराची बंदरावर केलेल्या हल्ल्याच्या स्मरणार्थ भारतीय नौदल दरवर्षी 04 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करते. या हल्ल्यात पाकिस्तानचे कराची बंदर आगीने जाळून खाक झाले होते आणि शत्रूच्या सागरी पृष्ठभागावरून आक्रमण करणाऱ्या अनेक लढाऊ नौका नष्ट झाल्या होत्या.

पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (FOCINC West) यांनी प्रादेशिक सुरक्षा विषयक आव्हानांबद्दल माहिती दिली, आणि सागरी सुरक्षा कायम राखण्यासाठी आणि राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी वेस्टर्न नेव्हल कमांड (डब्ल्यूएनसी) च्या सदैव (24×7) कार्यरत असलेल्या जहाजे, पाणबुड्या आणि विमानांच्या तैनातीचा ठळक उल्लेख केला . गेल्या वर्षभरात पश्चिम नौदल कमांडने गाठलेले टप्पे आणि हाती घेतलेले उपक्रम याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देण्यात आली. यात ऑपरेशन सिंदूर, मिशन-आधारित तैनाती, परदेशी नौदलांबरोबरच सराव, संरक्षण, सुरक्षा, मानवतावादी सहाय्य, अमली पदार्थ विरोधी आणि चाचेगिरीविरोधी कारवाया आणि आपत्ती निवारण, याचा समावेश होता.

देशाची आर्थिक समृद्धी, धोरणात्मक स्वातंत्र्य आणि व्यापक राष्ट्रीय शक्ती या गोष्टी सागराशी खोलवर जोडल्या गेल्या आहेत, याचा कमांडर-इन-चीफ यांनी पुनरुच्चार केला. म्हणूनच, आपला देश आणि नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सध्याच्या भू-राजकीय आणि भू-आर्थिक वातावरणातील विविध कल, धोके आणि आव्हाने यावर बारकाईने लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

विकसित समृद्ध भारतासाठी देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करणारे, एक लढाऊ सुसज्ज आत्मनिर्भर नौदल म्हणून, भारतीय नौदल आपल्या शेजारी प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यामध्ये हातभार लावते आणि हिंद महासागर प्रदेशात प्रथम प्रतिसाद देणारा  आणि पसंतीचा सुरक्षा भागीदार म्हणून आपले स्थान मजबूत करते.

About Matribhumi Samachar

Check Also

देशभरातल्या किनारी राज्यांसाठी मत्स्यपालन सहकारी संस्थांसाठी प्रगत क्षमता बांधणी कार्यक्रमाचे व्हॅम्निकॉमकडून आयोजन

वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेने (व्हॅमनिकॉम), नव्या नोंदणीकृत मत्स्यपालन सहकारी संस्थांसाठी सहकारी संस्थांचे प्रशासन …