Tuesday, February 17 2026 | 08:15:54 AM
Breaking News

मुंबईच्या नागरिकांना आधुनिक, शाश्वत व शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचणारी सेवा देण्यासाठी भारतीय टपाल विभागाचा परिवर्तनकारी उपक्रम

Connect us on:

मुंबई , 2 डिसेंबर 2025. भारतीय टपाल विभाग, मुंबई क्षेत्र यांनी मुंबईच्या नागरिकांना शेवटच्या टप्प्यापर्यंत दिल्या जाणाऱ्या सेवांचे आधुनिकीकरण व शाश्वतिकरण करण्याच्या दिशेने एक परिवर्तनकारी उपक्रम सुरु केला आहे. पार्सल्स ची वाढती संख्या लक्षात घेता ती ग्राहकांपर्यंत कार्यक्षमतेने पोहचण्याची आवश्यकता वाढत आहे. त्यासाठी भारतीय टपाल विभागाच्या मुंबई क्षेत्राने पायी पत्रे पोहचवण्यापेक्षा एक नवीन स्मार्ट पर्याय अंगिकारण्याचे ठरवले आहे.

भारतीय टपाल मुंबई क्षेत्रात स्मार्ट संचालन उपक्रमाअंतर्गत टीव्हीएस व्हीएमएस च्या सहयोगाने पोस्टमन/ पोस्टवुमन साठी इलेक्ट्रिक दुचाकी दिली जाणार असून त्या द्वारे एक समग्र सेवा परिसंस्था सुरु होत आहे. चकाला, मुंबई जीपीओ, सायन, दादर व काळबादेवी सहित मुंबईत नव्याने सुरु झालेल्या वितरण केंद्रांमधील पोस्टमन/पोस्टवुमनना टपाल  वितरणासाठी टीव्हीएस च्या इलेक्ट्रिक दुचाकी दिल्या जाणार आहेत. रोज येणारी पत्रे,पार्सल व अकौंट्स टपालसारख्या सर्व प्रकारच्या टपालाचे वितरण करण्यासाठी पोस्टमन/पोस्टवूमन या वाहनांचा वापर करतील.

या उपक्रमाअंतर्गत 211 दुचाकी देण्यात येणार असून त्यांचे संचालन सुरळीत, पर्यावरणस्नेही व रास्त दरात होण्यासाठी टपाल कार्यालयाजवळ विशेष चार्जिंग केंद्रे सुरु करण्यात आली आहेत.

हा पथदर्शी प्रकल्प 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता चकाला एम आय डी  सी टपाल कार्यालयातून सुरु होणार आहे. महाराष्ट्र व गोवा मंडळाचे मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंग , भारतीय टपालच्या मुंबई क्षेत्राच्या टपाल सेवा संचालक काईया अरोरा तसेच टीव्हीएस व्हीएमएस चे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित असतील.

About Matribhumi Samachar

Check Also

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील कार्यक्षेत्रातील सुरक्षितता सुधारण्यासाठी सेव्हलाइफ फाउंडेशन आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड अभियंत्यांना प्रशिक्षण देतात

पुणे, जानेवारी 2026 :त्यांच्या सध्या सुरू असलेल्या झिरो फॅटॅलिटी कॉरिडॉर (ZFC) उपक्रमांतर्गत, सेव्हलाइफ फाउंडेशनने २० जानेवारी …