पुणे, दिनांक ३ जानेवारी २०२५
पुण्यामध्ये आर्मी दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्यूरोतर्फे नागरिकांसाठी सैन्य विषयक माहिती आणि चित्र प्रदर्शन उभे करण्यात आले आहे. या बहुमाध्यम प्रदर्शनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भेट दिली.
यामध्ये भारतीय लष्कराशी संबंधित छायाचित्रे आणि माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. सोबतच डिजीटल मीडियाचा उपयोग करुन आकर्षक आणि मनोरंजक पद्धतीने नागरीकांना सैन्य दलाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.
आज या प्रदर्शनाला सुमारे पाच हजार मुले व नागरिक तसेच सर्व माध्यम प्रतिनिधींनी भेट दिली.
दक्षिण कमान मुख्यालयातर्फे आर्मी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून हे चित्र प्रदर्शन मांडण्यात आले आहे. ५ जानेवारी पर्यंत सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नागरिकांसाठी हे प्रदर्शन खुले आहे.
Matribhumi Samachar Marathi

