भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने वैद्यकीय वस्त्रांकरता गुणवत्ता नियंत्रण आदेश (Quality Control Order – QCO) जारी केला होता.
वैद्यकीय वस्त्रे, वैद्यकीय वस्त्रोद्योग (गुणवत्ता नियंत्रण) आदेश, 2024 या शिर्षकाअंतर्गत हा आदेश जारी केला गेला होता. वैद्यकीय वस्त्रांच्या श्रेणीअंतर्गत येणाऱ्या उत्पादनांची सुरक्षा आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मंत्रालयाने हा आदेश जारी केला होता. या आदेशाच्या माध्यमातून मंत्रालयाने गुणवत्ताविषयक कठोर मानके देखील निश्चित केली होती. यात चाचणी विषयक मानक कार्यपद्धती आणि अशा उत्पादनांच्या वर्गीकरणाशी (labelling) संबंधित अत्यावश्यक बाबींचाही अंतर्भाव केला होता.
लघु आणि मध्यम उद्योगांना सामोरे जावे लागत असलेल्या काही विशिष्ट आव्हानांची दखल घेत मंत्रालयाने वर नमूद केलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे (Quality Control Order – QCO) पालन करून त्याचा अवलंब करण्यासाठीच्या कालावधीसाठी मुदतवाढ दिली आहे. आता या मुदतवाढीनुसार या आदेशाचा अवलंब करण्यासाठीची अंतिम तारीख 1 एप्रिल 2025 पर्यंत असणार आहे. विशेषत: या आदेशातील अनुसूच A अंतर्गत नमूद सॅनिटरी नॅपकिन्स, लहान मुलांचे डायपर आणि एकापेक्षा अधिक वेळा वापरता येणारे सॅनिटरी पॅड / सॅनिटरी नॅपकिन / पाळीसाठीची विशेष अंतर्वस्त्रे – पीरियड पॅन्टी या तीन उत्पादनांसाठी ही नवी मुदतवाढ लागू असणार आहे. मंत्रालयाने दिलेल्या या सवलतीमुळे लघु आणि मध्यम उद्योगांना आपल्या व्यवसायाच्या कार्यान्वय पद्धतीशी कोणतीही तडजोड न करता या आदेशाअंतर्गतच्या नव्या नियमांचा अवलंब करणे सुलभ होणार आहे.
या आदेशाअंतर्गतच्या नव्या नियमांचा अवलंब करण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, आणि त्याकरता उत्पादक आणि आयातदारांना आपला सध्याचा उत्पादन साठा मोकळा करून घेता या उद्देशाने, त्यांना 6 महिन्यांचा म्हणजेच 30 जून 2025 पर्यंतचा कालावधीही उपलब्ध करून दिला आहे. या आदेशातील, या तरतुदींमुळे, या उद्दोग क्षेत्राताल कोणत्याही अडचणींशिवाय गुणवत्तेशी संबंधित नव्या मानकांशी जुळवून घेता येणार आहे.
सुरक्षेमध्ये सुधारणा घडवून आणणे, कार्यक्षमता वाढवणे आणि आरोग्य सेवा उद्योग आणि शेवटच्या टप्पावरचा ग्राहक यांच्यातली परस्परांबद्दलची विश्वासार्हता वाढवण्याच्या उद्देशानेच ही उपाय योजना केली गेली आहे. या उद्योगा क्षेत्राला नव्या गुणवत्ता मानकांच्या दिशेने सुलभतेने संक्रमण करता यावे यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालय त्यांना आवश्यक ते पाठबळ पुरवण्यासाठी वचनबद्ध आहे.
Matribhumi Samachar Marathi

