Saturday, February 07 2026 | 01:57:32 PM
Breaking News

‘एनसीसी’चा विस्‍तार करून तीन लाख कॅडेट्स जोडण्याची राज्यमंत्री संजय सेठ यांनी केली घोषणा

Connect us on:

नवी दिल्‍ली, 3 जून 2025.

संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी 3, जून 2025 रोजी भोपाळ येथे राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी) च्या विशेष संयुक्त राज्य प्रतिनिधी आणि अतिरिक्त/उपमहासंचालक परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी देशभरातून  तीन लाख कॅडेट्स जोडून  एनसीसीचा विस्तार करण्याची घोषणा केली, ज्याला अनेक राज्यांनी आधीच मान्यता दिली आहे आणि आवश्यक प्रशिक्षण पायाभूत सुविधा जलदगतीने पूर्ण करण्याप्रति वचनबद्धता दर्शविली आहे.

उपस्थितांना संबोधित करताना, संजय सेठ यांनी राष्ट्र उभारणी आणि युवकांच्या  विकासात एनसीसीच्या भूमिकेला दुजोरा दिला.  त्यांनी माजी सैनिकांना एनसीसी प्रशिक्षक म्हणून समाविष्ट करणे आणि माजी सैनिकांना नवीन रोजगार संधी उपलब्ध करून देणे, यासारख्या अलिकडच्या उपक्रमांचा उल्लेख केला  आणि स्वच्छ भारत अभियान, नया सवेरा योजना आणि नशा मुक्ती अभियान यासारख्या राष्ट्रीय मोहिमांमधील एनसीसीच्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले. संरक्षण राज्यमंत्र्यांनी 18, मे 2025 रोजी माउंट एव्हरेस्टवरील  यशस्वी चढाईबद्दल एनसीसी मोहिमेतील चमूचे अभिनंदन केले आणि हे  छात्रसैनिकांचे साहस आणि लवचिकतेचे एक उत्तम उदाहरण असल्याचे नमूद  केले.

केंद्र-राज्य सहकार्य सुरू ठेवण्याचे आवाहन करताना, संजय सेठ यांनी राज्यांना या ऐतिहासिक विस्ताराला सहकार्य करण्यासाठी मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि निधीपुरवठा याविषयी  त्यांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याचे आवाहन केले, ज्यामुळे युवकांना घडवण्यात आणि देशाचे भविष्य सुरक्षित करण्यात एनसीसीच्या महत्वपूर्ण भूमिकेला बळ मिळेल, असे ते म्हणाले.

एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी कॉर्प्सच्या कामगिरी आणि भविष्यातील रूपरेखा यांचा उल्लेख केला  ज्यामध्ये देशभरात मजबूत प्रशिक्षण आणि शिबीर संबंधित  पायाभूत सुविधा स्थापन करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.  त्यांनी अधिकाधिक तरुणांचा सहभाग वाढवण्याच्या आणि कॅडेट्सची कामगिरी सुधारण्याच्या उद्दिष्टावर भर दिला.

या कार्यक्रमात शिक्षण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, राज्यांचे विभागीय  प्रतिनिधी आणि सर्व राज्यांचे एनसीसी प्रमुख यांचाही सहभाग होता.

About Matribhumi Samachar

Check Also

आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेने नवी दिल्ली येथे साजरा केला चौथा स्थापना दिन

भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून …