Monday, December 08 2025 | 05:52:37 AM
Breaking News

विदर्भातील उद्योगवाढीच्या सर्व संभावनांचा कॉन्फिडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री- सीआयआयच्या विदर्भ विभागीय कार्यालयाने अभ्यास करावा – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी

Connect us on:

नागपूर 3 ऑगस्ट 2025. कुठल्याही उद्योगाच्या विकासासाठी पाणी ,ऊर्जा ,वाहतूक आणि संचार या गोष्टी महत्त्वाच्या असून विदर्भातील खनिज, कोळसा, वनउत्पादन पर्यटन कापूस उद्योग या सर्व उद्योगवाढीच्या संभावनांचा कॉन्फिडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्रीच्या विदर्भात होत असलेल्या विभागीय कार्यालयाने अभ्यास करून या क्षेत्रातील कमकुवत दुवे ओळखावे आणि त्यांना बलस्थानामध्ये रूपांतरित करावे, यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केंद्र आणि राज्य सरकार करेल अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग  मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर मध्ये दिली   .नागपुरात भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) नवीन विदर्भ विभागीय कार्यालयाचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

विभागीय कार्यालयाचा उद्घाटन कार्यक्रम आणि त्यासोबतच्या “इंडिया@१००: चार्टिंग विदर्भाज जरनी टू डेवलप्ड इंडिया’ या शीर्षकाखाली आयोजित परिषदेत बोलताना  गडकरी यांनी सांगितले की ,विदर्भात पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये कुठलीही उणीव  नसून उद्योगांनी यशस्वी तंत्रज्ञान वापरून या क्षेत्राच्या अनुरूप उद्योगांचा विकास केला पाहिजे. गडकरींनी सांगितलं की, विदर्भाच्या जवळ असणाऱ्या आंध्र प्रदेशमधील बंदरे ही मालवाहतूक खर्चामध्ये कपात करू शकतात.  विजयवाडा ते नागपूर हे अंतर 545 किलोमीटर असून ते मुंबईच्या तुलनेत कमी असून मुंबईतील मालवाहतुकीची हाताळणी खर्च  तसेच  वाहतूक कोंडी पाहता आंध्र प्रदेश मधील हे बंदर विदर्भातील मालवाहतुकीचा खर्च कमी करू शकतात .   रायपुर ते विशाखापटनम हा 47 हजार कोटीचा  महामार्ग पूर्णत्वास जात असून त्याला गडचिरोलीला जोडून हे आंध्र प्रदेश मधील बंदरे जर विदर्भाच्या जवळ आले तर येथील पोलाद उद्योग तसेच इतर उद्योगांना त्याचा फायदा होईल. भारतात मालवाहतुकीचा खर्च जो पूर्वी  16 टक्के होता तो आता चांगल्या रस्त्यांमुळे 16 टक्क्याहून केवळ  10 टक्के वर आला आहे हाच वाहतूक खर्च पुढच्या काळात  9 टक्के अशा एकेरी आकड्यात आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे  गडकरी यांनी  सांगितलं.

नवीन सीआयआय विदर्भ क्षेत्रीय कार्यालय हे विकेंद्रित सहभाग आणि प्रदेश-विशिष्ट विकासासाठी उद्योग संस्थेच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. नागपूर हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या संगमावर धोरणात्मकदृष्ट्या स्थित असल्याने, हे कार्यालय धोरणात्मक समर्थन, उद्योग-शैक्षणिक सहकार्य आणि एमएसएमई स्पर्धात्मकतेसाठी एक प्रमुख  मंच म्हणून काम करेल.असे सीआयआय पश्चिम विभागाचे अध्यक्ष  ऋषी कुमार बागला  यांनी यावेळी  स्पष्ट केले.  याप्रसंगी   “इंडिया@१००: चार्टिंग विदर्भाज जरनी टू डेवलप्ड इंडिया’ या शीर्षकाखाली आयोजित परिषदेत  विविध उद्योग संघटना, प्रतिनिधी यांनी आपले विचार मांडले.

नागपूरातील भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) नवीन विदर्भ विभागीय कार्यालय हे लक्ष्मीनगर येथे स्थित असून   ही संघटना  सल्लागार प्रक्रियांद्वारे उद्योग आणि सरकार दोघांशी भागीदारी करून, उद्योग वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे काम करते.

About Matribhumi Samachar

Check Also

विमान सेवा जलद गतीने पूर्ववत करणे आणि प्रवासी सुविधा उपाययोजना

वर्तमान कार्यस्थिती इंडिगो सेवा व्यत्ययामुळे निर्माण झालेली कोंडी  दूर करण्यासाठी आणि प्रवाशांना कोणत्याही प्रकारची सततची …