Sunday, April 12 2026 | 01:59:03 AM
Breaking News

नाविका सागर परिक्रमा II – INSV तारिणीचे लिटल्टन येथून प्रस्थान

Connect us on:

भारतीय नौदलाचे नौकानयन जहाज – INSV तारिणीने आज (4 जानेवारी 2025) सकाळी न्यूझीलंडच्या लिटल्टन पोर्टवरून स्थानिक वेळेनुसार 0930 वाजता (IST नुसार 0200 वाजता) फॉकलँड बेटांवरील पोर्ट स्टॅनले च्या दिशेने (तिसरा टप्पा) प्रस्थान केले. सुमारे 5600 सागरी मैल (सुमारे 10,400 किमी) अंतराचा हा मोहिमेतील सर्वाधिक अंतराचा टप्पा आहे. सुमारे दक्षिणेकडे 56 अंशांवरील ठिकाणाच्या दिशेने निघालेल्या तारिणीचा हा दक्षिणेकडील शेवटच्या टोकाचा  मार्ग देखील असेल.

लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए – या भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या दुहेरी प्रदक्षिणेच्या ऐतिहासिक मोहिमेचा दुसरा टप्पा पूर्ण करून INSV तारिणी, 22 डिसेंबर 24 रोजी लिटल्टन येथे दाखल झाली होती, ही मोहीम सागरी अन्वेषणाच्या भारताच्या  वाढत्या सामर्थ्याचे  प्रतीक आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

भारतीय नौदलाची हिंदी महासागरात ‘मैत्री’ची मोठी झेप; INS त्रिकंदचा सेशेल्समध्ये सराव पूर्ण

पोर्ट व्हिक्टोरिया, सेशेल्स: भारतीय नौदलाचे शक्तिशाली आणि अदृश्यता-क्षम (Stealth) युद्ध जहाज आयएनएस त्रिकंद (INS Trikand) …