Monday, December 08 2025 | 08:38:34 PM
Breaking News

बेल्जियमच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार बर्ट डी वेव्हर यांनी स्वीकारल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

Connect us on:

महामहीम बर्ट डी वेव्हर यांनी  बेल्जियमच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे अभिनंदन केले. भारत आणि बेल्जियम मधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि जागतिक स्तरावरील मुद्द्यांवर  सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी एकत्र काम करण्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

पंतप्रधानांनी एक्स समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये लिहिले आहे :

“पंतप्रधानपदाचा  कार्यभार स्वीकारल्याबद्दल बर्ट डी वेव्हर यांचे  हार्दिक अभिनंदन. भारत-बेल्जियम संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि जागतिक बाबींवर दोन्ही देशांमधील सहकार्य वाढवण्यासाठी एकत्र काम करण्यास मी उत्सुक आहे. तुमच्या भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा.”

About Matribhumi Samachar

Check Also

वीर नारी, माजी सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये उदारहस्ते योगदान देण्याचे संरक्षणमंत्र्यांचे आवाहन

देशात आज 7 डिसेंबर 2025 रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा होत आहे. सशस्त्र दलांच्या शौर्य, …