Monday, January 26 2026 | 11:50:01 AM
Breaking News

भारतीय नौदलाची वार्षिक सुरक्षा आढावा 2025 बैठक

Connect us on:

भारतीय नौदलाच्या सुरक्षेसंबंधी  शिखर बैठकीची आठवी आवृत्ती, वार्षिक सुरक्षा आढावा 2025, 02 ते 03 जुलै 2025 दरम्यान दक्षिण नौदल कमांड, कोची येथे आयोजित करण्यात आली होती. मिश्र पद्धतीने (ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही) झालेल्या या बैठकीत नौदलाच्या मुख्यालयातील अधिकारी, सर्व कमांड मुख्यालयांचे प्रतिनिधी आणि सुरक्षा वर्ग अधिकाऱ्यांनी भाग घेतला. दक्षिण नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हाईस एडमिरल व्ही श्रीनिवास यांनी मुख्य भाषण केले. दोन दिवसांच्या या आढावा बैठकीच्या पुढील कामकाजाचे अध्यक्षस्थान भारतीय नौदलाच्या सुरक्षा समितीचे अध्यक्ष असलेले व्हाईस एडमिरल के. स्वामीनाथन यांनी भूषविले.

या कार्यक्रमात, नौदलातील सुरक्षिततेचे वातावरण अधिक बळकट करण्यासाठी विविध भागधारकांनी विचार मंथन आणि चर्चा केली. कोची येथील इंडियन नेव्हल सेफ्टी टीम (आयएनएसटी) आणि भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लिकेशन्स अँड जिओइन्फॉरमॅटिक्स (बीआयएसएजी- एन) या संस्थांनी संयुक्तपणे विकसित केलेले सेफ्टी ट्रेंड ॲनालिसिस टूल  या ॲप्लिकेशनचा यावेळी प्रारंभ करण्यात आला. यासोबतच या बैठकीत, संपूर्ण नौदलात राबवण्यात आलेल्या सुरक्षा आणि जोखीम व्यवस्थापन उपक्रमांचा संग्रह देखील प्रकाशित करण्यात आला.

भारतीय नौदलाच्या सर्व कमांड, त्रि-सेवा अंदमान आणि निकोबार कमांड आणि सुरक्षा वर्ग अधिकाऱ्यांनी सुरक्षा उपक्रम आणि आव्हानांवर माहिती सादर केली. या बैठकीत सुरक्षेशी संबंधित अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भारतीय नौदल दरवर्षी ही उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक आयोजित करत असून या बैठकीचा मुख्य उद्देश परिचालन आणि कार्यात्मक  सुरक्षेच्या सर्व पैलूंचे विश्लेषण करणे तसेच संस्थात्मक पातळीवर सुरक्षिततेची संस्कृती बळकट करण्याचा आराखडा तयार करणे हा आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेने नवी दिल्ली येथे साजरा केला चौथा स्थापना दिन

भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून …