Saturday, December 06 2025 | 06:01:31 PM
Breaking News

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राचे फिट इंडियाच्या ‘संडेज ऑन सायकल’मोहिमेसाठी भारतीय टपाल खात्यासोबत सहकार्य

Connect us on:

मुंबई, 4 ऑगस्ट 2025. तंदुरुस्ती आणि सार्वजनिक सेवेच्या उत्सवात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने इंडिया पोस्टच्या सहकार्याने 03ऑगस्ट 2025 रोजी #SundaysOnCycle चा एक विशेष भाग आयोजित केला.

हा कार्यक्रम एकाच वेळी चार ठिकाणी आयोजित करण्यात आला होता: मुंबई जीपीओ, कर्जत टपाल कार्यालय, सटाणा टपाल कार्यालय आणि साई एनसीओई छत्रपती संभाजी नगर (छत्रपती संभाजी नगर टपाल विभागाच्या सहकार्याने), ज्यामध्ये 350 हून अधिक सायकलपटू उत्साहाने एकत्रितपणे सहभागी झाले होते. प्रमुख उपस्थितांमध्ये टपाल सेवा संचालक आणि सहाय्यक संचालक, उपसंचालक (प्रशासन), प्रशासकीय कर्मचारी तसेच पोस्टमन यांचा समावेश होता.

मुंबई जीपीओ येथे रेखा रिझवी यांनी हिरवा झेंडा दाखवला.

मुंबई जीपीओ येथे मुंबई जीपीओच्या संचालिका रेखा रिझवी यांनी औपचारिकरित्या या सायकल रॅलीला  हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी एक प्रेरणादायी संदेश सामायिक केला:

“या सायकलसफरीमुळे तंदुरुस्तीचा संदेश पसरू द्या आणि नागरिकांना लठ्ठपणाशी लढण्यासाठी प्रेरित करू द्या. आज, आमचे पोस्टमन केवळ पत्रे देत नाहीत तर कृतीचे आवाहन करत आहेत: आरोग्यासाठी सायकलसफर, बदलासाठी सायकलसफर!”

निरोगी भविष्याच्या दिशेने केल्या जाणाऱ्या प्रवासाचे प्रतीक असलेल्या या सायकलसफरीचा मार्ग मुंबई जीपीओपासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत विस्तारला होता.

इतर ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर:

कर्जत: राजाभाऊ एन. गाडगीळ, निवृत्त पोस्टमास्तर, नरिमन लाईन टपाल कार्यालय

सटाणा: साहेबराव म्हसदे, पोस्टमास्तर जनरल, सटाणा

औरंगाबाद: असद शेख, सहाय्यक संचालक, भारतीय टपाल  सेवा

#SundaysOnCycle हा उपक्रम फिट इंडिया चळवळ आणि खेलो इंडिया मोहिमेच्या उद्दिष्टांशी सुसंगत असून‌ क्रीडा प्राधिकरणाच्या पाठिंब्याने संपूर्ण भारतात गतिशील होत आहे तसेच सर्वांसाठी उपलब्ध असलेल्या शाश्वत, समुदाय-आधारित आरोग्यदायी  सवयींना प्रोत्साहन देत आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पुण्यात ‘एबीसी प्रो बास्केटबॉल लीग’ च्या चौथ्‍या आवृत्तीचा केला प्रारंभ

नवी दिल्ली, 7 जुलै 2025. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत काल, …