Saturday, January 10 2026 | 01:35:50 AM
Breaking News

आयएनएस अजय आणि आयएनएस निस्तार: पोलादाचा पुरवठा करून सेलने संरक्षण आत्मनिर्भरतेला दिली बळकटी

Connect us on:

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2025. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी पोलाद  उत्पादक महारत्न  कंपनी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) ने , जुलै 2025 मध्ये गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड (जीआरएसई) ने बांधणी केलेल्या आयएनएस अजय आणि हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (एचएसएल)ने बांधणी केलेल्या आयएनएस निस्तारसाठी महत्वपूर्ण विशेष पोलादाचा पुरवठा करून संरक्षण स्वदेशीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सेल ने आयएनएस अजयसाठी आवश्यक संपूर्ण  विशेष डीएमआर ग्रेड स्टील प्लेट्स पुरवल्या आहेत ज्या संरचनात्मक बळकटी  आणि स्टील्थ क्षमतेसाठी महत्वपूर्ण आहेत. आयएनएस अजय हे जीआरएसई द्वारे निर्मित स्वदेशी बनावटीच्या अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट (ASW-SWC) मालिकेतील आठवे आणि शेवटचे जहाज आहे.

सेल ने भारतातील पहिले स्वदेशी डिझाइन आणि निर्मित डायव्हिंग सपोर्ट व्हेसल आयएनएस निस्तारसाठी देखील आवश्यक संपूर्ण  विशेष ग्रेड प्लेट्स पुरवल्या आहेत. हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड द्वारा निर्मित आयएनएस  निस्तार, पाणबुडी बचाव कार्य, खोल समुद्रात डायव्हिंग आणि सतत गस्त घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सज्ज आहे.

भारताच्या नौदल सामर्थ्याला  बळकटी देण्याप्रति सेल वचनबद्ध असून राष्ट्रीय संरक्षण उद्दिष्टांना  धोरणात्मक पाठिंबा आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत त्याची अविभाज्य भूमिका यातून अधोरेखित होते . पोलादाच्या  प्रत्येक टन सह,सेल भारताच्या सागरी सज्जता आणि संरक्षण लवचिकतेचा पाया  अधिक बळकट बनवत आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

ॲक्सिस बँकेने वाढत्या डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी ग्राहकांच्या नियंत्रणाखालील सुरक्षा सुविधांसह ‘सेफ्टी सेंटर’ सुरू केले

ग्राहकांना रिअल-टाइममध्ये पूर्णतः नियंत्रित करता येणाऱ्या सुरक्षा सुविधांद्वारे सक्षम करते एसएमएस शिल्ड : बँकेकडून येणाऱ्या …