Sunday, December 07 2025 | 02:15:06 PM
Breaking News

औषधी वनस्पतींचे संवर्धन आणि जनजागृती बळकट करण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने दोन धोरणात्मक सामंजस्य करारांवर केली स्वाक्षरी

Connect us on:

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2025. नवी दिल्लीतील निर्माण भवन येथे आज केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने (एनएमपीबी) दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली.

पहिला सामंजस्य करार राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ (एन एम पी बी) आणि ईशवेद-बायोप्लांट्स व्हेंचर, पुणे, महाराष्ट्र यांच्यात झाला तर दुसरा त्रिपक्षीय सामंजस्य करार राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ (एन एम पी बी), अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (एआय आय ए) आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), नवी दिल्ली यांच्यात झाला.

या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले, “2047 पर्यंत निरोगी आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आपल्या आजच्या प्रयत्नांसाठी मार्गदर्शक ठरले आहे.

भारताच्या समृद्ध औषधी वनस्पती वारशाचे संवर्धन आणि प्रचार करण्यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण टप्पा दर्शविणाऱ्या या महत्त्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करणाऱ्या सर्व संस्थांचे मी अभिनंदन करतो. आधुनिक विज्ञानाशी पारंपरिक ज्ञानाची सांगड घालून आपण हे महत्त्वाकांक्षी स्वप्न साकार करण्याच्या दिशेने अर्थपूर्ण प्रगती करत आहोत.”

या दोन्ही सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यामागील उद्देश असा आहे:

एनएमपीबी आणि ईशवेद-बायोप्लांट्स व्हेंचर यांच्यातील सामंजस्य करार 1

टिश्यू कल्चर पद्धतींद्वारे दुर्मिळ, लुप्तप्राय आणि धोक्यात असलेल्या (आरईटी) औषधी वनस्पतींच्या जनुकीय सामग्रीचे जतन आणि संवर्धन करणे.

यामुळे आयुष उद्योगात वापरल्या जाणाऱ्या दुर्मिळ, लुप्तप्राय आणि धोक्यात असलेल्या (आर ई टी) श्रेणीतील औषधी वनस्पतींचा पुरवठा सुलभ करण्यासाठी टिश्यू कल्चर पद्धतींचा विकास आणि व्यापक लागवड आणि देखभाल शिष्टाचार यांच्या सहाय्याने भागधारकांना चांगले मूल्य मिळेल, जेणेकरून या औषधी वनस्पतींच्या जनुकीय सामग्रीचे जतन आणि संवर्धन करता येईल. ज्यामध्ये, दोन्ही पक्ष औषधी वनस्पती क्षेत्र आणि आयुष उद्योगाच्या विकासासाठी आणि फायद्यासाठी त्यांच्या संबंधित कौशल्यांचा आणि संसाधनांचा वापर करण्यासाठी सहकार्य क्षेत्रांचा वेध घेतील.

एनएमपीबी, एआयआयए आणि एम्स यांच्यात सामंजस्य करार 2

औषधी वनस्पतींबद्दल जनजागृती करण्यासाठी, संबंधितांचे ज्ञान आणि कौशल्य सामायिक करण्यासाठी, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमार्फत नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानाच्या आवारात राष्ट्रीय स्तरावरील औषधी वनस्पती उद्यानाची स्थापना करणे.

यामुळे दूरदूरच्या भागातून येणाऱ्या रुग्णांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये औषधी वनस्पतींबद्दल जनजागृती निर्माण होईल आणि रुग्णालयाच्या परिसरात येणाऱ्यांनाही याचा फायदा होईल.

दोन्ही सामंजस्य करार म्हणजे आयुष मंत्रालयाच्या औषधी वनस्पती क्षेत्रातील तथ्यावर आधारित संवर्धन, संशोधन आणि सार्वजनिक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठीच्या सततच्या प्रयत्नांमधील महत्वाचा टप्पा आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वर्ष 2025 साठीचे दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कार केले प्रदान

नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (3 डिसेंबर 2025) आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या …