Saturday, December 06 2025 | 02:54:21 PM
Breaking News

भारतीय मानक ब्युरोच्या मुंबईतील छापेमारीत 64 बनावट ‘पॉवर अडॉप्टर’ जप्त

Connect us on:

भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखेने 28 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत अंधेरी पश्चिम येथील जेपी रोड येथे सुरेश पाटील बिल्डिंग मधील दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 01 मधील मेसर्स रतन आयटी सोल्युशन्स वर छापा टाकला. मानक चिन्हाचा गैरवापर होत असल्याची माहिती मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आली.

ही कंपनी मानक चिन्हाविना आयटी उपकरणांसाठीच्या पॉवर अडॅप्टरची विक्री, भाड्याने घेणे, लीज वर देणे, साठवणे किंवा विक्रीसाठी प्रदर्शित करणे अशा प्रकारात गुंतली असल्याचे छाप्यादरम्यान आढळून आले. आयटी उपकरणांसाठी वापरले जाणारे पॉवर अडॅप्टर IS 13252 (भाग 1): 2010 नुसार बीआयएस प्रमाणित नव्हते, त्यामुळे बीआयएस अधिनियम 2016 च्या कलम 17(1) आणि 17(3) चे उल्लंघन झाले. या छाप्यादरम्यान आयटी उपकरणांसाठीचे 64  पॉवर अडॅप्टर जप्त करण्यात आले.

‘बीआयएस’अर्थात भारतीय मानक ब्युरो ही बीआयएस कायदा 2016 अंतर्गत स्थापन झालेली भारताची राष्ट्रीय मानक संस्था असून ग्राहकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि गुणवत्ता अनुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी सतत कार्यरत आहे. बीआयएस, मानक निश्चिती, उत्पादनांचे प्रमाणीकरण, प्रयोगशाळेत चाचणी आणि प्रणालीचे प्रमाणीकरण या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. बीआयएस सुरक्षित, खात्रीलायक आणि दर्जेदार उत्पादने उपलब्ध होण्यास मदत करते आणि ग्राहक संरक्षण, उत्पादन सुरक्षा, अन्न सुरक्षा, पर्यावरण संरक्षण आणि बांधकामाशी संबंधित प्रमुख सार्वजनिक धोरणांना समर्थन देऊन राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देते.

बीआयएस कायदा 2016 अंतर्गत, कोणत्याही व्यक्तीला वैध बीआयएस परवान्याशिवाय मानक चिन्ह (आयएसआय चिन्ह) वापरून कोणतेही उत्पादन तयार करणे, वितरण करणे, विक्री करणे, भाड्याने देणे, लीज वर देणे किंवा प्रदर्शित करण्याची परवानगी नाही. उत्पादक आणि विक्रेत्यांच्या दंड आणि दायित्वांबद्दल तपशीलवार माहितीसाठी नागरिक बीआयएस कायदा 2016 ची मदत घेऊ शकतात.

सर्व ग्राहकांनी बीआयएस प्रमाणित  आवश्यक उत्पादनांची यादी पाहण्यासाठी बीआयएस केअर अॅपचा (अँड्रॉइड आणि आयओएस) वापर करावा असे आवाहन बीआयएसने केले आहे. तसेच वस्तू खरेदी करण्यापूर्वी उत्पादनावरील आयएसआय चिन्ह किंवा हॉलमार्क यांची सत्यता पडताळण्यासाठी  http://www.bis.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच, जर कुठे बंधनकारक उत्पादने `बीआयएस` प्रमाणनाशिवाय विक्रीस ठेवली जात असतील किंवा आयएसआय चिन्ह अथवा प्रमाणचिन्हाचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले, तर त्याची माहिती प्रमुख, `एमयुबीओ`, पश्चिम क्षेत्रीय  कार्यालय, बीआयएस, 5 वा मजला, सीईटीटीएम संकुल, हिरानंदानी गार्डन, पवई, मुंबई – 400076 येथे कळवावी, असे आवाहन देखील केले आहे. अशा तक्रारी [email protected] या ई-मेल पत्त्यावरही नोंदवता येऊ शकतात. बीआयएस अशा माहितीचा स्रोत गोपनीय राखते.

About Matribhumi Samachar

Check Also

इंडिगो सेवा व्यत्ययाबद्दल नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांचे निवेदन

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने विमान वेळापत्रकातील, विशेषतः इंडिगो एअरलाइन्सच्या, सध्याच्या व्यत्ययाला तोंड देण्यासाठी तातडीने आणि …