नागपूर 4 डिसेंबर 2025. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत नागपूरच्या अमरावती रोड स्थित गोंडखैरी येथील प्रादेशिक सेंद्रीय आणि शेती केंद्र -आरसीओएनएफ द्वारे 5 डिसेंबर शुक्रवार रोजी जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून नैसर्गिक शेती संदर्भात एकदिवसीय कार्यशाळा आणि प्रात्यक्षिकाचे नागपूरच्या सिव्हिल लाईन स्थित एनडीआरएफ अकॅडमी येथे सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले आहे .या कार्यशाळेचे उद्घाटन नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी एनडीआरएफ अकादमी नागपूरचे महा उपसंचालक डॉ. हरिओम गांधी आणि आरसीओएनएफचे क्षेत्रीय संचालक डॉ.ए. एस. राजपूत उपस्थित राहतील .
या कार्यशाळेला प्रगतिशील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक संघ देखील उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेचा उद्देश नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीतील तत्वे ,गुड प्रॅक्टिसेस ,मान्यतेसाठीच्या गरजा आणि या संदर्भातील केंद्रीय शासनातर्फे लागू असलेल्या योजनांची माहिती प्रगतीशील शेतकरी यांना देऊन या माहितीची देवाण-घेवाण पुढील शेतकऱ्यांना देणे असा आहे .या कार्यशाळे दरम्यान शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे शेतीतील संसाधनांचे व्यवस्थापन देखील समजावून सांगितले जाणार आहे .
Matribhumi Samachar Marathi

